शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गोरेवाडा तलावावर देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 11:29 IST

पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्देपॉवरग्रीडचे कार्यकारी महापौरांसमोर सादरीकरणतीन मेगावॅट क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. जागेच्या अभावामुळे हा सोलर प्रकल्प तलावातच उभारण्याचा विचार असून देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प म्हणून तो ओळखला जाईल.पॉवरग्रीडच्या संचालक आणि अधिकाऱ्यांची मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयात बैठक झाली. तीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपअभियंता दीपक चिटणीस, पॉवरग्रीडचे कार्यकारी संचालक संजय गर्ग, व्यवस्थापक अनुराग श्रीवास्तव, उपव्यवस्थापक डॉ. विनय सेनरे उपस्थित होते. गोरेवाडा तलावावर तीन मेगावॅट ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पॉवरग्रीडने नागपूर महापालिकेसमोर ठेवला आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत, मनपा किती रक्कम या प्रकल्पात गुंतवेल, गुंतवणुकीसाठी किती निधी उपलब्ध करण्यात येईल, प्रकल्पाचा खर्च किती वर्षात निघेल आणि किती वर्ष मोफत वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून पॉवरग्रीडच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतच्या सर्व शक्यता तपासून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना दिले.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय