शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पतंगाने घेतला पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:42 IST

इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सोमवारी पुढे आले.

ठळक मुद्देट्रॉमा केअर सेंटरमध्ये तरुणाचा मृत्यू : मांजाने गळा कापल्याने तरुणी अत्यवस्थ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सोमवारी पुढे आले. पतंगाच्या नादात हा पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या प्रकरणात रविवारी वाडी परिसरात मांजामुळे एका तरुणीचा गळा कापल्याने अत्यवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.मृताचे नाव सादिक गुलाम नबी शेख (३५) रा. नागपूर असे आहे.प्राप्त माहितीनुसार, १५ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सादिक हा इमारतीच्या छतावर पतंग उडवत होता. अचानक त्याचा तोल जाऊन खाली पडला. मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले. शरीराच्या इतरही भागावर गंभीर इजा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.दुसऱ्या घटनेत, सहयोगीनगर नारी रोड येथील रहिवासी श्रद्धा शेंडे (२४) ही परीक्षा देऊन वाडी परिसरातून घरी जात होती. वाटेत तिच्या गळ्यात पतंगचा मांजा अडकला. गळा कापल्याने रक्तस्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या घटनेने श्रद्धा बेशुद्ध झाली. परिसरातील लोकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी इस्पितळात दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पतंगाच्या हुल्लडबाजीत ‘सुरे’ ठरू पाहणाऱ्या मांजाच्या विक्रीवर व वापरण्यावर बंदी आहे. परंतु त्यानंतरही मोठ्या प्रमाणात या मांजाचा वापर झाल्याने दुचाकी वाहन चालकांसोबत पायी चालणारे जखमी झाले. काहींवर इस्पितळात उपचार घेण्याची वेळ आली. सध्या मकर संक्रात संपली असली तरी पतंगची हुल्लडबाजी अजूनही सुरू आहे. मांजाचे कधी थांबणार बळी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :kiteपतंगDeathमृत्यू