शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील दुधाळा येथे पहिल्यांदाच भरला आठवडी बाजार; १५ कि.मी.ची पायपीट थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:17 IST

साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार दुधाळा येथे पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला.

ठळक मुद्देभाजीपालाविक्रेत्यांचे गुलाबपुष्पांनी केले स्वागत१७०० पैकी फक्त ६०० गावातच बाजार भरतो

आॅनलाईन लोकमतनागपूर : साधारणत: ११०० लोकसंख्या असलेल्या दुधाळा (ता. मौदा) येथे आठवडी बाजार भरत ग्रामस्थांना पायपीट करीत रामटेक, नगरधन, चाचेर, मौदा, कन्हान येथे जावे लागत होते. तेथून भाजीपाला, किरकोळ वस्तू आणाव्या लागत. सकाळी निघालेली व्यक्ती सरळ रात्रीच घरी पोहोचत असे. परिणामी अख्खा दिवसच नागरिकांचा वाया जात होता. ही बाब लक्षात घेता गावातच आठवडी बाजार भरला तर नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होऊ शकते, यावर विचारमंथन होऊन आठवडी बाजार भरविण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार दुधाळा येथे पहिल्यांदाच आठवडी बाजार भरला. आता गावातच आठवडी बाजार भरणार असल्याने ग्रामस्थांची पायपीट थांबली असून नागरिकांना दिलासा मिळाला.दुधाळा या गावातील नागरिकांना कोणतेही काम करायचे असल्यास नागरिकांना १० ते १५ किमी अंतर पायपीट करावी लागते. त्यातच भाजीपाला किंवा अन्य किरकोळ खरेदी म्हटले की नागरिकांना त्रासदायक होते. ही बाब लक्षात घेता सरपंच सूर्यकांत चिंचुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण उमाळे, सक्षोधन कळंबे, उपसरपंच उमेश झलके यांनी गावात आठवडी बाजार भरविण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार आठवडी बाजार भरविण्यावर एकमत होऊन शुक्रवारी (दि. २४) आठवडी बाजार भरविला.यानिमित्त भाजीपाला विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांचे सरपंच चिंचुलकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.हा बाजार आता दर शुक्रवारी दुधाळा येथे भरणार आहे. त्यामुळे नागरिकांना गावातच भाजीपाला आणि अन्य किरकोळ साधने खरेदी करता येणार असून पायपीट थांबली. या बाजाराचा दुधाळ्यासह हिंगणा, नेरला, नंदापुरी, हातोडी, गांगनेर, खेडी, चोखाळा, किरणापूर, खोपडी, बारशी, चाचेर, नवेगा येथीलही नागरिकांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Marketबाजार