शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षानंतर केला पहिला ट्विट अन बनले ‘चौकीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 10:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हटल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग झाला आहे.

ठळक मुद्देभाजपात ‘चौकीदार’ बनण्याची उत्सुकतादेशमुख, माने व महात्मे दूरच

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चौकीदार म्हटल्यानंतर ‘चौकीदार’ हा शब्द लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग झाला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले ट्विटर अकाऊंट चौकीदार नावाने सुरू केले आहे. नागपूर लोकसभा क्षेत्रातही भाजपाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमध्ये चौकीदार शब्द जोडला आहे. परंतु यात काही असेही आहे, जे ट्विटवर कधीही अ‍ॅक्टिव्ह नव्हते, पण चौकीदार शब्दाचा प्रचार होत असल्याने देखाव्यासाठी ते चौकीदार बनले.महापौर नंदा जिचकार यांचे ट्विटर अकाऊंट मार्च २०१० रोजी बनले आहे. परंतु नऊ वर्षात त्यांनी केवळ ११ ट्विट केले आहे. यातही २०१० मध्ये केवळ तीन ट्विट केले. २०१७ मध्ये दोन व २०१८ मध्ये पाच ट्विट केले. २०१८ नंतर त्यांचा ट्विट १७ मार्च २०१९ ला आला आणि त्या ट्विटवर ‘चौकीदार’ बनल्या. यापूर्वी महापौर म्हणून ट्विटवर अ‍ॅक्टिव्ह राहण्याची गरज त्यांना वाटली नाही. परंतु ‘चौकीदार’ बनण्यासाठी त्या एक वर्षानंतर अ‍ॅक्टिव्ह झाल्या. भारतीय जनता पक्षाच्या ‘चौकीदार’ कॅम्पेनमध्ये नागपुरातील भाजपाची नेतेमंडळी जुळली आहे. परंतु १९ मार्चपर्यंत नागपुरातील भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. विकास महात्मे तसेच आमदार डॉ. मिलिंद माने व आमदार सुधाकर देशमुख यांनी कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला नाही. विकास महात्मे जून २०१६ पासून ट्विटवर आहे. आतापर्यंत त्यांनी १३ ट्विट केले आहे. परंतु ११ नोव्हेंबर २०१६ पासून एकही ट्विट केले नाही. मात्र डॉ. माने यांनी अजूनही ट्विटर अ‍ॅक्टिव्ह केलेले नाही. आ. सुधाकर देशमुख हे जून २०१७ पासून ट्विटरवर आहे. आतापर्यंत त्यांनी ४९५ ट्विट केले आहे.

हे बनले ‘चौकीदार’ट्विटरवर आपल्या अकाऊंटशी ‘चौकीदार’ जोडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह अनेक नेते ‘चौकीदार’ बनले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक