शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पहिल्यांदाच यकृत व मूत्रपिंडाचे एकाचवेळी प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:28 IST

एकाचवेळी एकाच रुग्णालयात यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण होण्याची नागपुरातील पहिलीच घटना सोमवारी समोर आली. ६४ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या दोन मुलींनी वेळेत घेतल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. उपराजधानीत अवयवदानाचे महत्त्व रुजत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देबडवाईक कुटुंबाचा पुढाकार : तिघांना जीवनदान तर दोघांना मिळाली दृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाचवेळी एकाच रुग्णालयात यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण होण्याची नागपुरातील पहिलीच घटना सोमवारी समोर आली. ६४ वर्षीय मेंदू मृत (ब्रेन डेड) वडिलांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या दोन मुलींनी वेळेत घेतल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. उपराजधानीत अवयवदानाचे महत्त्व रुजत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.विजय बडवाईक (६४) रा. सोनेगाव असे त्या दात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात शर्तीचे उपचार सुरू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी शनिवारी ते ब्रेन डेड झाल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना दिली. सोबतच अवयवदान करण्याचा सल्लाही दिला. बडवाईक यांच्या मुली नयना दहातोंडे व पौर्णिमा झोडे यांनी वेळ न घालविता अवयवदानाचा निर्णय घेतला. हॉस्पिटलने झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनात नागपूर झोनल कोआॅर्डिनेटर वीणा वाठोरे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेवर यकृत प्रत्यारोपण तर पहिल्यांदाच या हॉस्पिटलमध्ये एका पुरुष रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. राहुल सक्सेना यांनी केली. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. रवी देशमुख, डॉ. एस.जे. आचार्य, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. अनिल सिंग यांनी केली. यांना हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. आनंद संचेती, न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांनी मदत केली. दुसरे मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील पुरुष रुग्णाला देण्यात आले. नेत्रदान माधव नेत्रपेढीला तर त्वचादान आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या रोटरी त्वचा बँकेला देण्यात आले.पुणे-मुंबईच्या तुलनेत अवयवदानात अजूनही नागपूर मागे असले तरी अवयवदान जनजागृतीचा प्रभाव आता दिसून येत आहे. एकट्या न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये गेल्या चार महिन्यात १० प्रत्यारोपण झाले. तर शहरात या वर्षी हे १२ वे प्रत्यारोपण होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणातही नागपूरने आघाडी घेतली आहे. सोमवारी ६७ व ६८वे प्रत्यारोपण झाले.मुलींनीच केले अंत्यसंस्कारवडील गेल्याच्या दु:खातही स्वत:ला सावरत दोन्ही मुली नयना दहातोंडे व पौर्णिमा झोडे यांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. सायंकाळी सहकारनगर घाटावर त्या दोघींनी स्वत: अंत्यसंस्कारही केले. ‘लोकमत’शी बोलताना पौर्णिमा व नयना म्हणाल्या की, वडिलांना सामाजिक कार्याची जाण होती. हयात असताना त्यांनी नेत्रदानाचा अर्जही भरला होता. त्यांच्याच प्रेरणेने अवयवदानाचा निर्णय घेऊ शकलो. वडिलांच्या चौदावीला लागणारा पैसा हा वृद्धाश्रमाला दान म्हणून देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर