शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

आधी रेल्वेचे जाळे मजबूत करा, मगच बुलेट ट्रेन चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:25 IST

रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.

ठळक मुद्देएम. राघवय्या : २ लाख ७० हजार रिक्त जागा भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम. राघवय्या यांनी केले.नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले असताना एम. राघवय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०१७ मध्ये रेल्वेने देशात १६ हजार कोटी नफा मिळविला. हा नफा म्हणजे १३ लाख १६ हजार कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे प्रतिक आहे. परंतु शासनाने रेल्वेची संपत्ती विकून विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्याचे धोरण सुरू केले आहे. यात हजारो कामगार काम करीत असलेले कारखाने खासगी कंत्राटदारांच्या हाती सोपविण्यात येत आहेत. स्किल इंडियाच्या नावाखाली केंद्र शासन युवकांमधील स्कील नेस्तनाबूत करण्याचा सपाटा लावत आहे. त्यामुळे शासनाने विदेशी कंपन्यांशी केलेले अ‍ॅग्रिमेंट रद्द करावे, रेल्वे कर्मचाºयांमध्ये विदेशी चलन मिळविण्याची शक्ती असून कारखान्यांमधील उत्पादन वाढवून मालाच्या निर्यातीद्वारे विदेशी चलन मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, नवी पेन्शन योजना लागू करूनये, विदेशी कंपन्यांचे कंत्राट रद्द करावे या मागण्यांवर महिनाभरात कारवाई न केल्यास संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एक दिवस रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केल्यास शासनाला तीन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर, महासचिव डॉ. प्रवीण बाजपेयी, कार्याध्यक्ष डी. भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधाई, संघटन सचिव ई. व्ही. राव, युवा संरक्षक अमित भटनागर, सोलापूरचे विभागीय सचिव आर. विश्वनाथ उपस्थित होते.प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य द्यारेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आठ तास काम करावे असा नियम आहे. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कर्मचारी १२ तासांची ड्युटी करीत आहेत. कंत्राटदारांना कामे दिल्यामुळे ते कामगारांचे शोषण करीत असून कॅटरिंगमध्ये प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळत नाही. त्यामुळे राजकीय मागण्यांपेक्षा प्रवाशांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी एम. राघवय्या यांनी केली.

टॅग्स :railwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन