शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिली स्लिप लॅब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:16 IST

निद्रानाशाने जगभरात ३५ ते ५४ टक्के नागरिक पीडित आहेत़ यामुळे निद्रानाशाचे अचूक निदान व उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिल्या ‘स्लिप लॅब’चे उद्घाटन शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देनिद्रानाशाचे निदान व उपचार होणार : जगात रुग्णांचे प्रमाण ३५ ते ५४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झोप ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. परंतु पुरेशी झोप न झाल्यास, मानसिक आजार, मधुमेह, रक्तदाब व कॅन्सरचा धोका वाढतो. निद्रानाशाने जगभरात ३५ ते ५४ टक्के नागरिक पीडित आहेत़ यामुळे निद्रानाशाचे अचूक निदान व उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिल्या ‘स्लिप लॅब’चे उद्घाटन शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी रेस्पीरेटरी व स्लिप मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम उपस्थित होते.अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ ‘स्लिप अ‍ॅपनिया’ नावाचा आजार जागतिक स्तरावर चार टक्के वयस्क व्यक्तीमध्ये आढळतो़ त्याचप्रमाणे झोपेचा ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ नावाचा आजार १० टक्के लोकांमध्ये आढळतो़ उशिरा झोपणारे किंवा रात्रपाळीत काम करण्याऱ्या व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता असते. रात्री झोपेत घोरणे हा ‘स्लिप अ‍ॅपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. या आजारात श्वसनात अडथळा निर्माण होतो़ झोपेत अचानक श्वास थांबल्यामुळे मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा थांबतो व त्यामुळे झोपेच्या ‘सायकलमध्ये’ अडथळा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वरूपाचे गंभीर आजार होतात. यात हृदयविकाराचा झटका येणे, मधुमेह, मानसिक रोग, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, थॉयराईड, ग्रंथीचे आजार, वंंध्यत्व, लैंगिक समस्या, अ‍ॅसिडीटीचा त्रास होण्याची दाट शक्यता असते़ यामुळे निद्रानाशाचे निदान व उपचारासाठी ‘स्लिप लॅब’ महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती डॉ. मेश्राम यांनी दिली,उद्घाटन कार्यक्रमाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, विभाग प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. संजय रामटेके, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. पीपी देशमुख, डॉ. भावना सोनकुसरे, डॉ. बॅनर्जी, डॉ. अमोल समर्थ, मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे, नर्सिंग स्टाफ व निवासी डॉक्टर उपस्थित होते. संचालन डॉ. सुशांत मुळे यांनी केले तर आभार डॉ. रवी यादव यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. पंकज घोलप, डॉ. गोपाल सोलंकी, डॉ. प्रशांत, गीता मेश्राम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर