शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिले अनुसूचित जात प्रमाणपत्र गोवारी समाजाला प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:33 IST

कविता श्रावण सायरे या गोवारी समाजाच्या महिलेला पहिले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे.

ठळक मुद्दे२४ वर्षांनंतरच्या संघर्षाचे यश आता शासनाच्या अध्यादेशाची प्रतीक्षा

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कविता श्रावण सायरे या गोवारी समाजाच्या महिलेला पहिले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांना बहाल केले आहे. त्यांना मिळालेले हे अधिकृत प्रमाणपत्र १९८५ नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच मिळाले आहे. यासाठी गोवारी समाजाला ११४ लोकांचा बळी द्यावा लागला. २४ वर्षांचा संघर्ष करावा लागला. त्यानंतर मिळालेले हे यश आहे.कविता सायरे यांनी १८ डिसेंबर २०१८ रोजी अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. आर्वीच्या उपविभागीय अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी करून अर्ज प्रलंबित ठेवला होता. त्यामुळे कविता सायरे यांनी १४ आॅगस्ट २०१८ च्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी १८ जानेवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती आर.के. देशपांडे व विनय जोशी यांनी २५ जानेवारी रोजी निर्णय दिला. न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, सरकारच्या कुठल्याही परिपत्रक आणि जीआरची वाट न बघता गोवारींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. न्यायालयाचा आदेश कविता सायरे यांनी उपविभागीय अधिकाºयांना दाखविला असता, त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्रदान केले.स्वातंत्र्यानंतर गोवारींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत होते. पण शासनाने २४ एप्रिल १९८५ ला एक परिपत्रक काढून गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या अधिकारापासून वंचित केले. तेव्हापासून गोवारींचा संघर्ष सुरू झाला. २३ नोव्हेंबर १९९४ ला निघालेल्या मोर्चामध्ये ११४ गोवारी बांधवांचा बळी गेला. त्यानंतर सातत्याने आंदोलन, मोर्चे निघाले. न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी उच्च न्यायालयाने गोवारी हेच आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. याच निर्णयाच्या आधारे गोवारींना पहिले जात प्रमाणपत्र दिले आहे.

१४ आॅगस्ट २०१८ ला उच्च न्यायालयाने गोवारी आणि गोंडगोवारी एकच आहे असा निर्णय दिला. याच निर्णयाच्या आधारे न्यायालयाने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. न्यायालयाने गोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार मिळवून दिले. पण शासन अजूनही अध्यादेश न काढून गोवारींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे.- कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना. 

टॅग्स :Governmentसरकार