शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

‘विठाबाई’ नाटकाला प्रथम पारितोषिक

By admin | Updated: December 5, 2014 00:38 IST

५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावरून अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘विठाबाई’ या नाटकाला २० हजार रुपयांचे निर्मितीचे प्रथम पारितोषिक

राज्य नाट्य स्पर्धा : ‘कमेला’ द्वितीय तर ‘घर हरविलेली माणसं’ तृतीय स्थानीनागपूर : ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्रावरून अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘विठाबाई’ या नाटकाला २० हजार रुपयांचे निर्मितीचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर केंद्रावरील निकाल आज जाहीर केला. विठाबाई या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर केंद्रावरून १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार बोधी फाऊंडेशनने सादर केलेल्या ‘कमेला’ या नाटकाला तर तृतीय पुरस्कार महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र सांस्कृतिक मंडळाने सादर केलेल्या ‘घर हरविलेली माणसं’ या नाटकाला निर्मितीचा १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय दिग्दर्शनाचे प्रथम संजय जीवने (विठाबाई), द्वितीय श्याम मोहरील (घर हरविलेली माणसं), नेपथ्याचे प्रथम संजय काशीकर (घर हरविलेली माणसं) आणि द्वितीय मनोज वासनिक (कमेला), प्रकाशयोजनेचे प्रथम शिवशंकर माळोदे (घर हरविलेली माणसं) आणि द्वितीय मिथून मित्रा (कमेला) यांना जाहीर करण्यात आले. रंगभूषेचे प्रथम पारितोषिक बाबा खिरेकर (विठाबाई) आणि वासंती यांना ऋतुस्पर्श नाटकासाठी जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक श्रीराम जोग (डहूळ) आणि सांची जीवने यांना विठाबाई नाटकासाठी देण्यात आले. अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्र सीमा गोडबोले (क्षण एक पुरे प्रेमाचा), रेणुका चुटके (ऋतुस्पर्श), कल्याणी गोखले (चलती का नाम गाडी), केतकी कुळकर्णी (तो एक उंबरठा), श्याम मोहरील (घर हरविलेली माणसं), श्रीकांत भोगले (केस नं. ९९), विनय मोडक (आजही कैकयी) आणि अतुल सोमकुंवर यांना ‘हिटलर की आधी मौत’ या नाटकासाठी जाहीर करण्यात आली आहेत. १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सायंटिफिक सभागृहात जल्लोषात सादर झालेल्या या स्पर्धेत एकूण १३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रमेश कदम, सुरेश खालविलकर आणि अनिल कुळकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)