शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'कोरोना' रुग्णांसाठी भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:12 AM

छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूरकर डॉक्टरांचा पुढाकार : सुरक्षितरीत्या ने-आण करणे शक्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चे संकट संपूर्ण जगभरात पसरले असताना वैद्यकीय यंत्रणेतील लोक हिमतीने त्याचा सामना करत आहेत. मात्र ‘कोरोना’ रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी नेणे हे जोखमीचे काम आहे. छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते ही यंत्रणा ‘मेयो’ इस्पितळाला देण्यात आली.‘कोरोना’ रुग्णांना रुग्णवाहिकेतून तसेच इस्पितळातदेखील विविध ठिकाणी न्यावे लागते. तपासणीसाठी नेताना एका खाटेहून दुसऱ्या खाटेवर उचलावे लागते. त्यांना नेण्यात येणाऱ्या मार्गावर डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, ड्रायव्हर इत्यादी लोक असतात. त्यामुळे या सर्वांनाच संसर्ग होण्याचा धोका असतो. या परिस्थितीत ‘कोरोना’ रुग्णांना सुरक्षित वाहतूक यंत्रणा कशी उपलब्ध करून दिली जाऊ शकते, या विचारातून ‘ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’तर्फे पुढाकार घेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी अथक प्रयत्नातून आगळीवेगळी वाहतूक यंत्रणा विकसित केली.या यंत्रणेत रुग्णास एका पारदर्शक बंद उपकरणात ठेवल्या जाते. या उपकरणात प्राणवायूचा पुरवठा सतत सुरू असतो. रुग्णाला काहीही त्रास होणार नाही, अशी ही यंत्रणा आहे. रुग्ण बाहेरच्या लोकांशी बोलू शकतो. ‘व्हेंटिलेटर’ असलेला रुग्णही या यंत्रणेतून सुरक्षितपणे नेता येतो, हे विशेष. डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. परीक्षित महाजन यांची जिद्द, कल्पकता आणि परिश्रम तसेच वैयक्तिक निधी यातून ही यंत्रणा तयार केली आहे. शिवाय डॉ. अमोल कडू यांचेदेखील सहकार्य लाभले.गुरुवारी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून नितीन गडकरी व डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते मेयो इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. केवलिया यांना ही यंत्रणा हस्तांतरित करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Nitin Gadkariनितीन गडकरी