शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पहिले भारतीय संविधान साहित्य संमेलन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:26 IST

संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.

ठळक मुद्दे८ व ९ जूनला आयोजन : न्या. रोही अध्यक्ष व अभय बंग उद्घाटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.माजी सनदी अधिकार ई. झेड. खोब्रागडे यांच्या पुढाकारातून संविधान फाऊंडेशनतर्फे दीक्षाभूमीवरील ऑडिटोरियममध्ये हे संमेलन होईल. संमेलन स्वागताध्यक्षा रेखा खोब्रागडे या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संविधानिक हक्क व कर्तव्याला धरून विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे. उद्घाटनीय सत्रात अन्न व औषधी विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड विशेष अतिथी असतील. यावेळी भारतीय सनदी सेवेतील १९५६ च्या तुकडीचे ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन (दिल्ली) यांचा प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला जाईल. याशिवाय संविधान जागृतीसाठी भरीव योगदान देणारे विलास राऊत, विलास गजभिये, ज्ञानेश्वर रक्षक, पन्नालाल राजपूत, गजलकार प्रा. हृदय चक्रधर, हरीश इथापे, भूपेश सवाई, कविश्वर जारुंडे, नरेश वाहाणे, सुरेंद्र टेंभुर्णे, गौतम मेश्राम, अ‍ॅड. स्मिता कांबळे, आनंद गायकवाड, अतुल खोब्रागडे, बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूर, जाईबाई चौधरी स्कूल नागपूर, महारष्ट्र ऑफिसर्स फोरम, फुले-आंबेडकर संविधान समिती, चंद्रपूर, विदर्भ मुस्लिम इन्टेलेक्च्युुुअल फोरम, नागपूर, बहुजन विचार मंच यांना ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०१९’ देऊन गौरव केला जाईल.दुर्बल घटकांच्या संवाद सत्रात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या सचिव अ‍ॅनी राजा, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर, सामाजिक कार्यकर्त्या समीना शेख, उद्योग विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन, नागालॅण्डचे पोलीस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, जनमंचचे प्रा. शरद पाटील, गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनिल प्रथम, भविष्य निर्वाह आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, आयकर विभागाचे सहआयुक्त अजय ढोके, प्रो. विमल थोरात, औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ मोकणे, अतुल खोब्रागडे व श्वेता उंबरे सहभागी होतील.पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, क्रांती खोब्रागडे(आयआरएस), डॉ. जीवन बच्छाव (आयआरएस), पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सचिन ओंबासे, स्वच्छंद चव्हाण(आयआरएस), हे युवा सनदी अधिकारी सहभागी होतील. ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता न्या. किशोर रोही यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. यात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सुनीलकुमार गौतम, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. शंकर खोब्रागडे आदी उपस्थित असतील. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी डॉ. मुन्शीलाल गौतम यांचाही सत्कार करण्यात येईल. संमेलनाच्या जागरासाठी सहकार्याचे आवाहन प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, विजय बेले, शिरीष कांबळे, नेहा खोब्रागडे, दिगंबर गोंडाणे, दीपक अवथरे, विजय कांबळे आदींनी केले आहे.

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर