तीन लाखांहून अधिक लाभार्थींना दुसरा डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात १८ पेक्षा अधिक वयोगटाचे लसीकरण २३ जूनपासून सुरू झाल्यापासून लसीकरणासाठी युवकांत उत्साह वाढला आहे. १७ जुलैपर्यंत नागपूर शहरात एकूण ८ लाख २० हजार ५८५ लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला, तर ३ लाख २१ हजार ९९२ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला व दुसरा डोस असे एकूण ११ लाख ४२ हजार ५१७ डोस देण्यात आले आहेत.
६० वर्षांवरील नागरिकांना १ लाख ९१ हजार ८०० लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला आहे. १८ वर्षांंवरील २ लाख ६८ हजार ८७९ लाभार्थींना डोस देण्यात आले, तर ४५ वर्षांवरील १ लाख ७१ हजार ४३१ लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला आहे. ४६ हजार ५०५ आरोग्यसेवक, तर ५३ हजार ३८७ फ्रंटलाइन वर्कर्सला पहिला डोस देण्यात आला आहे. असे असले तरी मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे.
.....
नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (१७ जुलै)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४६,५०५
फ्रंटलाइन वर्कर - ५३,३८७
१८ वयोगट - २६८८७९
४५ वयोगट -१,७१४३१
४५ कोमार्बिड - ८८५८३
६० सर्व नागरिक - १,९१८००
पहिला डोस - एकूण - ८२०५८५
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २६७३३
फ्रंटलाइन वर्कर -२६८२८
१८ वयोगट - १४१५६
४५ वयोगट - ११२६०१
४५ कोमार्बिड - २६८२३
६० सर्व नागरिक -११४८५१
दुसरा डोस - एकूण - ३२१९९२
संपूर्ण लसीकरण एकूण - १११४२५१७
....