शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने सेल्फीस नकार दिल्याने नागपुरात गुंडाने केला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:11 IST

एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून जबरदस्ती करणाऱ्या गुंडाला अडविणाऱ्या युवकावर त्याने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे १.४५ वाजता घडली.

ठळक मुद्देआरोपी फरारतरुणीच्या मित्राने समजावण्याचा केला प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून जबरदस्ती करणाऱ्या गुंडाला अडविणाऱ्या युवकावर त्याने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे १.४५ वाजता घडली.रविवारी रात्री येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या झिरो डिग्री बारमध्ये काही तरुण तरुणी जेवण्यासाठी आले होते. काही वेळाने आरोपी मिहीर मिश्रा हा आपल्या साथीदारांसह तेथे आला व त्यांनी दारु पिण्यास सुरुवात केली. दरम्यान या तरुणी सेल्फी काढण्यात मग्न असताना आरोपी मिश्रा त्यांच्याजवळ जाऊन स्वत:सोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करू लागला. त्यांनी नकार देताच त्याने लगट सुरू केली व लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून या तरुणींच्या मित्रांपैकी एक, राजेश इंद्रपाल कुशवाहा (३०) याने मिश्राला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर कमरेला खोचलेली पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली. त्याचा नेम चुकल्याने कुशवाह वाचला. या घटनेमुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ झाला. हॉटेल कर्मचारी व मिश्राच्या मित्रांनी त्याला कसेबसे आवरून हॉटेलबाहेर नेले व त्यानंतर तो पळून गेला. या प्रकरणाची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचले. राजेशने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिहीर मिश्राविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, धमकी देणे व विनापरवाना घातक शस्त्र बाळगणे याबाबत गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर मिहीर मिश्राला अटक झालेली नव्हती. 

टॅग्स :Selfieसेल्फी