शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन अभ्यासक्रम बंधनकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:51 IST

अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला निर्णय : अट शिथिल करण्याचे निर्देश

ऑनलाईन लोकमत नागपूर :अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याच्या अटीला शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर महापालिका व आपात्कालीन सेवा विभागात सेवा प्रवेशासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांच्यातर्फे मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांना १७ नोव्हेंबर २०१७ रोजी यासंबंधीचे पत्र जारी केले आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात सविस्तर रिपोर्ट मागितला आहे. मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांनी संबंधित पत्र अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांना पाठवून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मनपात नवीन आकृतिबंधाने भर्ती प्रक्रियेत अडचणी येणार नाही.नागपुरातील अग्निशमन विभागातील मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार अग्निशमामक विमोचकाच्या रिक्त पदासाठी सरळ भर्ती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. यासाठी पात्र उमेदवाराने राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र महाराष्ट्र मुंबईचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यासक्रमाची अट विदर्भातील युवकांसाठी नुकसानकारक होती. ती तातडीने रद्द करण्याची मागणी होत होती. अग्निशमन समितीचे सभापती अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा मुद्दा उचलला. तसेच महापौर नंदा जिचकार यांनाही ही अट रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते, हे विशेष.बालपांडे यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे अग्निशमन सेवेत येण्यास इच्छुक असलेल्या विदर्भातील युवकांचा मोठा लाभ होणार आहे. ही अट रद्द झाली नसती तर जितके पद आहेत, त्यापेक्षाही कमी उमेदवारांनी अर्ज केला असता. यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होतो. अखेर यश मिळाले. उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट ठेवली जाऊ शकते.कुठल्याही महिलेने अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाहीअग्निशामक विमोचकाच्या २५० जागा आहेत. पूर्वीची अट कायम राहिली तर ३० जागा सुद्धा भरल्या जाणार नाही. ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यांना सुद्धा हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट आहे. आजवर कुठल्याही महिलेने हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाही.