लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील टॅक्स विभागाच्या कार्यालयातील एसीला सोमवारी सायंकाळी ६.३५ च्या सुमारास अचानक आग लागली. माहिती मिळताच तळमजल्यावरील अग्निशमन विभागातील कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. परंतु तोपर्यंत विभागाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी आग विझविली. परंतु आगीमुळे कक्षात सर्वत्र धूर पसरला होता.सायंकाळी ६ नंतर मुख्यालयातील विविध विभागातील बहुसंख्य कर्मचारी ड्युटीवरून घरी जातात. टॅक्स विभागातील कर्मचारीही घरी निघून गेले होते. सायंकाळी ६.३५ च्या सुमारास कार्यालयातील एका एसीला आग लागली. विभागाचे सहायक अधीक्षक वानखेडे व जलप्रदाय विभागाचे पीयूष काटे येथे उपस्थित होते. त्यांनी लगेच एसीचा प्लग काढला. काटे यांनी विभागात असलेल्या आग विझविण्यासाठीच्या उपकरणाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले. कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता बाळगली नसती तर आग इतरत्र पसरली असती.
मनपा मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:13 IST
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील टॅक्स विभागाच्या कार्यालयातील एसीला सोमवारी सायंकाळी ६.३५ च्या सुमारास अचानक आग लागली.
मनपा मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला