शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

हॉटेलला आग

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

सी.ए. रोडवरील एका हॉटेलमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग लागली. या आगीत हॉटेलमधील स्वयंपाक खोली जळून खाक झाली. आगीमुळे सर्वत्र धूर पसरला. कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

सिलिंडर लिकेज : धुरामुळे कर्मचारी स्वयंपाक खोलीत फसले नागपूर : सी.ए. रोडवरील एका हॉटेलमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग लागली. या आगीत हॉटेलमधील स्वयंपाक खोली जळून खाक झाली. आगीमुळे सर्वत्र धूर पसरला. कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु धुरामुळे ते स्वयंपाक खोलीतच फसले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आणि कर्मचाऱ्यांनाही सुखरूप बाहेर काढले. सी.ए. रोड येथे हरपालसिंह बावेजा यांचे हॉटेल अमिर आहे. येथे दुपारी अचानक आग लागली. पहिल्या माळ्यावरील स्वयंपाक खोलीत सिलिंडर लिकेज असल्याने ही आग लागली. यावेळी स्वयंपाक खोलीमध्ये अनेक सिलिंडर ठेवून होते. उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आणखीनच वाढली. अग्निशमन दलाला लगेच सूचना देण्यात आली. दरम्यान सर्वत्र धूर पसरला. हॉटेलमधून धूर निघत असल्याने बाहेर बघ्यांची गर्दी जमली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. तसेच स्वयंपाक खोलीत फसलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. दुपारी ३ पर्यंत परिस्थिती आटोक्यात आली. (प्रतिनिधी)