शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे

By admin | Updated: June 16, 2014 01:12 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे.

५० हजारांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे. या सोबतच सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ही उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षणही देणार आहे. आगीसारखी दुर्घटना घडून रु ग्णांचे प्राण संकटात सापडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. अधिष्ठात्यांनी उपकरणे खरेदीच्या प्रस्तावाला गुरु वारी मंजुरीही दिली आहे. विजेचे उपकरण, पेट्रोलियम पदार्थ आणि रसायनांमुळे लागणाऱ्या तिन्ही स्वरूपाच्या आगी विझविण्यासाठी वापरले जाणारे ‘फायर इस्टिंग्युशर सिलिंडर’ कार्यान्वित केले जाणार आहेत. आॅपरेशन थिएटर, पेर्इंग वॉर्ड, एमआर आॅफिस आणि अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हे उपकरण लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. स्थानिक स्तरावर ५० हजार रु पयांपर्यंतच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार अधिष्ठात्यांना असतो. त्यात मेडिकलमध्ये गेल्या आठवड्यात ई-लायब्ररीजवळ आगीची दुर्घटना घडली होती. प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने या आगीत सरकारी मालमत्तेचे नुकसान होता होता वाचले होते. या घटनेला गंभीरतेने घेत वॉर्डांमध्ये अशी घटना घडू नये, यासाठी अधिष्ठात्यांनी या फायर फायटिंग उपकरण खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रगती कॉलनीतील मॉडर्न ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीला या फायर फायटिंग उपकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकल रुग्णालयातील आॅपरेशन थिएटर परिसरात सहा, पेर्इंग वॉर्डात चार, एमआर आॅफिस परिसरात सहा आणि अधीक्षकांच्या कार्यालयालया जवळच्या ईएनटी बाह्यरु ग्ण विभागात दोन असे १८ सिलिंडर बसविणार आहे. (प्रतिनिधी)