अरुंद रस्त्यांवरील उंच इमारतीमधील आग विझवण्याला मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. याचा विचार करता महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सक्षम करण्याची गरज आहे. अरुद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग आटोक्यात आणताना अडचण येत आहे. याचा विचार करता अग्निशमन विभाग ३२ मीटरची हायड्रोलिक प्लेटफार्म खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु निधीअभावी प्रस्ताव रखडला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या १३६ कोटीच्या निधीतून हे वाहन खरेदी केले जाणार आहे.
तीन ते चार वेळा निविदा काढण्यात आली. ब्रीजवासी कंपनीच्या पालघर येथील फॅब्रिकेशन युनिटमधून ही ८.२६ कोटींची मशीन खरेदी करण्याला मंजुरी मिळाली आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु निधी नसल्याने फाईल थांबली होती.
....
वर्षभरानंतर येईल वाहन
हायड्रोलिक प्लेटफार्म उपलब्ध होण्याला वर्ष लागणार आहे. कार्यादेश मिळताच कंपनी वाहन हस्तांतरित करण्याचे आदेश जारी करण्यात येतील. याला वर्षभराचा कालावधी लागणार आहे. अग्निशमन विभागाकडे ४२ मीटरचे टर्न टेबल लँन्डर आहे. १५ मीटर उंचीचा हायड्रोलिक प्लेटफार्म होते. परंतु ते जुने असल्याने ३२ मीटरचे प्लेटफार्म खरेदी केले जात आहे.