शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:18 IST

सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ही आग दोन एकर परिसरात पसरली.

ठळक मुद्देधुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त दिवसभराच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी आग आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ही आग दोन एकर परिसरात पसरली. धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. आगीमुळे घबराटही पसरली होती. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांनी ही आग सायंकाळच्या सुमारास आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळताच मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या पोहचल्या. तसेच जेसीबीच्या साहाय्याने आग रोखण्यासाठी चर फाडून कचरा वेगळा करण्यात आला. त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. भांडेवाडी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे विन्ड्रोज तयार करण्यात आले आहे. या परिसराला ही आग लागली. १४ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आली. परंतु कचºयामुळे पुुन्हा आग लागण्याचा धोका लक्षात घेता पाण्याचा मारा रात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आला. अशी माहिती प्रदीप दासरवार यांनी दिली.भांडेवाडी परिसराला संरक्षण भिंत आहे. परंतु सूरजनगरच्या बाजूने काही ठिकाणी भिंत नादुरुस्त असून परिसरातील काही नागरिक भिंतीवरून डम्पिंग यार्डमध्ये येतात. याच बाजूने ही आग लागली होती. डम्पिंग यार्डला उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र विन्ड्रोजमुळे गेल्या वर्षी आग लागण्याची घटना घडली नव्हती.

 

टॅग्स :fireआग