शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अंबाझरीतील डॉ. आंबेडकर स्मारकप्रकरणी एफआयआर दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 20:55 IST

Nagpur News अंबाझरी तलावाशेजारील २० एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह जमीनदोस्त करून या जागेवर स्मारकाचा उल्लेख न करणाऱ्या दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

नागपूर : अंबाझरी तलावाशेजारील २० एकर जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह जमीनदोस्त करून या जागेवर स्मारकाचा उल्लेख न करणाऱ्या दोषींविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अंबाझरी तलावाशेजारील ४४ एकर जागेवर ५७ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक अस्तित्वात होते. परंतु, ही जागा महाराष्ट्र शासनाने महापालिकेला आणि त्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित केली. महामंडळाने ही जागा ऑनलाईन टेंडरद्वारे गरुडा अम्युझमेंट पार्क या कंपनीला दिली. या सर्व प्रक्रियेत या जागेच्या सातबारावर त्याची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे गरुडा अम्युझमेंट पार्क या कंपनीने टीनाचे शेड उभारून स्मारक जमीनदोस्त केले. या प्रकरणी गरुडा कंपनी, तलाठी अंबाझरी नागपूर, सर्कल अधिकारी नागपूर, महापालिका आयुक्त, पर्यटन मंत्रालयाचे सचिव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला जे. बी. रामटेके, विश्रांती झांबरे, विशेष फुटाणे, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ फेब्रुवारीला मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब, निरक्षर आदिवासींच्या जमिनी हडपून खासगी कंपन्यांना विकण्यात आल्या असून यात आदिवासींना कुठलीही भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात व आदिवासी व शासकीय जमीन अतिक्रमणधारकांना न्याय देण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने ३ फेब्रुवारीला चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या हल्लाबोल मोर्चात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

............

टॅग्स :agitationआंदोलन