शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धमकावणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवा : ‘जेएमएफसी’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:42 IST

बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत.

ठळक मुद्दे सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : बलात्काराच्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व आरोपांची आवश्यक चौकशी करून अंतिम अहवाल सादर करावा असे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने हुडकेश्वर पोलिसांना दिले आहेत.यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदम यांनी तक्रार दाखल केली होती. २०११ मध्ये मगदम हे इमामवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्याकडे संबंधित महिला आरोपी असलेल्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आली होती. दरम्यान, त्यांना महिलेला तिचे घर विकायचे असल्याचे कळले. मगदम यांनी ते घर २० लाख रुपयांत खरेदी केले. त्यासाठी त्यांनी १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. २०१४ मध्ये घराचे विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यानंतर महिलेने मगदम यांना घराचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच, ती मगदम यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत होती. यासंदर्भात मगदम यांनी सुरुवातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी जेएमएफसी न्यायालयात धाव घेतली. मगदम यांच्यातर्फे अ‍ॅड. समीर सोनवाने यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयOrder orderआदेश केणे