शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपातील अधिकारी-ठेकेदारांवर एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 20:45 IST

रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देमहिलेच्या मृत्यूसाठी दोषी : साडेचार महिन्यानंतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषी मनपा उद्यान विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.इंद्रप्रस्थ कॉलनी, सोनेगाव येथील रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय साधना शशिकांत पुराडभट या ४ मार्च रोजी पतीसोबत बाहेर जेवण करायला गेल्या होत्या. पोलीस सूत्रानुसार रात्री ९.१५ वाजता पुराडभट दाम्पत्य दुचाकीने घराकडे जात होते. आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यान शिव मंदिरसमोर झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. मनपाच्या उद्यान विभागातील ठेकेदाराच्या माध्यमातून झाडाची कटाई करण्यात आली होती. परंतु कापलेल्या फांद्या रस्त्याच्या मध्येच टाकण्यात आल्या. फांदीवरून दुचाकी नेल्याने वाहन अनियंत्रित झाले व पुराडभट दाम्पत्य खाली पडून जखमी झाले. गंभीर जखमी असल्याने साधना यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. शशिकांत पुराडभट आणि इतर लोकांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारवर मनपा उद्यान विभागातील अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध निष्काळजी बाळगल्याने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याने अनेक लोकांचा या फांद्यामुळे अपघात झाला. परंतु गंभीर जखमी न झाल्याने कुणी तक्रार केली नाही. साधना यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटविण्यात आल्या. पोलीस दोषी अधिकारी व ठेकेदाराचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका