शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची माहिती दडविणाऱ्यावर नागपुरात एफआयआर दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 20:17 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्ये संसर्गित होऊनही लोक मनावर घेण्याच्या तयारीत नाहीत. कोरोनाची लागण झाल्याची शंका येऊनही याबद्दल प्रशासनासमोर माहिती लपविण्याचा प्रकार सुरू आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसतरंजीपुरातील मृताच्या संपर्कात आला होता : पत्नीही मिळाली पॉझिटिव्ह

लोकमत न्यूय नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामध्ये संसर्गित होऊनही लोक मनावर घेण्याच्या तयारीत नाहीत. कोरोनाची लागण झाल्याची शंका येऊनही याबद्दल प्रशासनासमोर माहिती लपविण्याचा प्रकार सुरू आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरातील एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला होता. यानंतर संबंधित मृत वृद्धाच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील काही व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यापासून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याच्या कामी पोलीस लागले आहेत. शांतिनगर परिसरातील एकच व्यक्ती त्या मृत वृद्धाच्या संपर्कात आला होता. त्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तो मेयो रुग्णालयातही गेला होता. मात्र प्रशासनाने वारंवार विचारणा करूनही त्याने ही माहिती दडवून ठेवली. मात्र परिसरातील नागरिकांना ही माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला कळविले. त्यानंतर त्याला पत्नी आणि दोन मुलांसह क्वारंटाईन करण्यात आले. तपासण्यांमध्ये त्याची पत्नी पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने या घटनेकडे अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. अधिक तपास करता यावा यासाठी पोलिसांनी ही वस्ती सील केली. या दरम्यान कडक चौकशी केली असता त्याच्या कुटुंबात १३ सदस्य असल्याची बाब पुढे आली. त्या सर्वांची माहिती घेऊन सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी