शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात उत्तर : खर्च वृद्धीची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.आरोपींमध्ये कंत्राटदार बाजोरिया कन्स्ट्रक्शनचे संचालक सुमित बाजोरिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंसाधन विभागाचे माजी मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस. आर. सूर्यवंशी, बुलडाणा सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता शरद गावंडे, अधीक्षक अभियंता बी. एस. वावरे, अधीक्षक अभियंता भीमाशंकर पुरी व कार्यकारी अभियंता आर. जी. मुंदडा यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या खर्च वृद्धीची चौकशी सुरू असून ती लवरकच पूर्ण केली जाईल असेही न्यायालयाला सांगण्यात आले आहे.बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडील अन्य तीन प्रकल्पांबाबत राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विदर्भातील ३८ सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहाराची खुली चौकशी करीत असून त्यात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती शासनाने दिली आहे. तसेच, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प व दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची अमरावती जलसंसाधन विभागातील दक्षता केंद्राचे अधीक्षक अभियंत्यांनी चौकशी केली आहे. त्याचा अहवाल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी सादर करण्यात आला आहे. शासन त्या अहवालाची पडताळणी करीत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.या चारही प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात कंत्राटदार अतुल जगताप यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व राज्य शासनाच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी याचिकाकर्त्याला दोन आठवड्यांचा वेळ दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर