शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:22 IST

आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ अभियंता भरत नारायण गावंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेळके यांच्या विरोधात कलम २९४, ३२३, व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुपरवायझरला शिवीगाळ करून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीचे सुपरवायझर यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बंटी शेळके यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास महाल भागातील शेळके यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ अभियंता भरत नारायण गावंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेळके यांच्या विरोधात कलम २९४, ३२३, व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाल कोठीरोड परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या भागातील नागरिकांचे जुने नळ कनेक्शन बदलवून नवीन देण्यात आलेले आहेत. पाच दिवसापूर्वी लोहीवाडा परिसरातील सुयोग भगवंत अपार्टमेंट येथील एका महिलेने पाईपलाईन टाकल्याने केबल तुटल्याबाबत यशवंत उरकुडे यांना फोन केला. उरकुडे यांनी पाईपलाईनमुळे केबल तुटले नसल्याची खात्री करून दिली. त्यानंतरही शेळके यांनी बुधवारी सकाळी उरकुडे यांना फोन करून पुन्हा बोलावले. त्यानुसार उरकुडे शेळके यांच्या कार्यालयात पोहचले असता शेळके यांनी उरकुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच गावंडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाईपलाईनमुळे केबल तुटले नसल्याचे पाईपलाईनच्या ठिकाणी खोदकाम करून स्पष्ट केले.

टॅग्स :Crimeगुन्हाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका