आपत्ती व्यवस्थापन : विभागीय आढावा बैठकनागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला कशा पद्धतीने तोंड देता येईल, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गतवर्षी आलेल्या अडचणीपासून बोध घेत यंदा त्यावर उपाययोजना शोधा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पूर्व विदर्भातील अधिकार्यांच्या बैठकीत विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या व पावसाळ्यापूर्वी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.बैठकीला पावसाळ्याच्या काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणेने तत्काळ मदतीसाठी धाव घ्यावी, तसेच या काळात अफवा पसरू नये याचीही काळजी घ्यावी, पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री तयार ठेवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागपूर विभागात गेल्या वर्षी ज्या अडचणी आल्या त्यावर यंदा मात करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.आपात्कालीन परिस्थितीत सुसज्ज मोटारबोट, जीवनरक्षक ज्ॉकेट, प्रशिक्षित बोट चालक सुसज्ज असल्याची माहिती नागपूर विभागातील जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिली. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वीजपुरवठा खंडित होणे, दूरध्वनीसेवा ठप्प होणे आदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे मदत कामात अडथळे येतात. या सेवा तत्काळ सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, असे आयुक्तांनी सांगितले.बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा (नागपूर), नवीन सोना (वर्धा), रणजित कुमार (गडचिरोली), दीपक म्हैसकर (चंद्रपूर), डॉ. माधवी खोडे (भंडारा), अमित सैनी (गोंदिया), जीआरसी कामठीचे कर्नल मॉरियो, मेजर राजकुमार सिंग, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपायुक्त ए.के. सिंग, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने, अतिरिक्त आयुक्त एस.जी. गौतम, उपायुक्त एम.एच. खान, बाळासाहेब धुळाज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे व इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आपत्ती व्यवस्थापन बैठकीत उपस्थित विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व इतर.
गतवर्षीच्या अडचणींवर यंदा मार्ग शोधा
By admin | Updated: June 5, 2014 01:07 IST