शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 11:28 IST

सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?हायकोर्टाच्या आदेशानंतर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेच्या वतीने बुलडोजर चालविला जात आहे. मात्र मंदिर तोडणे हा हिंदू धर्मावर आघात असल्याचे कारण देत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेविरुद्ध बजरंग दलाचे ‘हनुमान’ मैदानात उतरले आहेत!गोरगरीब विद्यार्थ्यांचे मंदिर आणि श्रद्धास्थान असलेल्या महापालिकेच्या ३५ शाळा बंद पडल्या तरी याविरुद्ध ना बजरंग दलाने लोकआंदोलन उभे केले ना मराठीचा लळा असलेल्या शिवसेना आणि मनसेने! मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात कृती समितीची उभारणी झाली. या समितीत बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेली कृतीही तितकीच ‘शून्य’ आहे.देशात, राज्यात आणि नागपुरात सत्ता असलेल्या भाजपचा डिजिटलायझेशनवर भर आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून सरकारने विकासाचा मंत्र दिला आहे. मात्र १५ वर्षांची सत्ता उपभोगूनही भाजपला बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा ‘स्टॅण्ड अप’ का करता आल्या नाही ? याबाबत मन की बात करण्यासाठी भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. चार वर्षांत ४,१६१ विद्यार्थी कमी होणे. त्यामुळे ३५ शाळा बंद पडणे ही बाब ‘इनोव्हेटिव्ह सिटी’चा नंबर १ पुरस्कार पटकाविणाऱ्या नागपूरसाठी निश्चितच लाजिरवाणी आहे. त्यामुळे महापालिका आणि सरकार सीबीएसई शाळामालकांच्या समर्थनात तर नाही ना, असा कुणी आरोप केल्यास तो चुकीचा ठरेल का? बंद पडलेल्या मनपा शाळांच्या जीर्णोद्धारासाठी भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार, ज्येष्ठ गोंधीवादी विचारवंत लीलाताई चितळे कृती समितीच्या आंदोलनात दिसल्या. मात्र या आंदोलनाला लोकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने सत्ताधाऱ्यांनी आणि सीबीएसईवाल्यांनी यात ‘आनंद’ मानला. पालिकेप्रमाणे जि.प. शाळांची हीच अवस्था आहे. राज्यात आजही काही अशा सरकारी शाळा आहेत, त्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे ‘कुलदैवत’ आहेत. यात पंढरपूरच्या पांढरेवस्ती येथील जि.प.शाळेचा नंबर लागतो. ही शाळा ३६५ दिवस सुरू असते. रविवारची सुटी नसते. औरंगाबादच्या सांजखेडा येथील जि.प. शाळाही त्यातलीच एक आहे.सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्याला लाजवेल त्यापेक्षाही चांगले इंग्रजी या शाळेचे विद्यार्थी बोलतात. पंढरपूर, औरंगाबाद आणि भंडारा जिल्ह्यातील खराशीच्या जि.प. शाळात हे शक्य आहे तर ‘इनोव्हेटिव्ह’ आणि स्मार्ट नागपुुरात हे का होत नाही ?शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्यास नागपुरात दानदात्यांचीही कमतरता नाही. गिरीश गांधींसारख्या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यास तासाभरात हे होऊ शकते. शिर्डीच्या साई संस्थानने एका झटक्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी ७१ कोटींचे दान दिले. कोट्यवधीच्या दानाच्या बळावर नागपुरातही टेकडीच्या गणेशाला सोन्याचा मुकुट चढवून जीर्णोद्धार केला जात आहे. लोकसभा तोंडावर आल्याने यूपीत योगी आदित्यनाथांनी ‘राम’जप सुरू केला आहे. मात्र महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत?

टॅग्स :Schoolशाळा