शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
3
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
4
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
5
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
6
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
7
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
8
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
9
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
10
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
11
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
12
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
13
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
14
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
15
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
16
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
17
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
18
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
19
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
20
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?

जगण्याच्या उमेदीला हवेय आर्थिक पाठबळ

By admin | Updated: January 4, 2016 05:14 IST

जबलपूरच्या सकरा येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत सफाई कामगार असलेल्या रामबाबू विदेसीराम महतो यांचा

जबलपूरच्या रामबाबू महतो यांच्या पत्नीची आर्त हाक : दानदात्यांच्या मदतीवरच जीवन अवलंबूननागपूर : जबलपूरच्या सकरा येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत सफाई कामगार असलेल्या रामबाबू विदेसीराम महतो यांचा मागील महिन्यात एक मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात गेले. जबलपूरच्या रुग्णालयात त्यांना एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना नागपुरात हलविण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यापासून ते नागपुरातील सीम्स हॉस्पीटलमध्ये भरती आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे पण या गरीब कुटुंबाजवळचे सारेच आता संपले आहे. महतो यांच्या जगण्याच्या उमेदीला आता समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.जबलपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती असताना त्यांच्यावरच्या उपचारासाठी आठ लाख रुपये खर्च झाले. बँक आॅफ महाराष्ट्रने काढलेल्या आरोग्य विम्याचे तीन लाख आणि पत्नी मधुबाला हिने सारे दागिने विकून उपचारांचा खर्च केला. त्यानंतर नागपुरातील सीम्स हॉस्पीटल, बजाजनगर येथे त्यांना आणण्यात आले. पण मधुबाला यांच्याजवळ उपचारांसाठी पैसा नाही. अशा प्रतिकुलतेत त्यांच्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्रच्या एससी, एसटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव आनंद रहाटे धावून आले. महतो यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्या उपचाराला प्रतिसादही मिळतो आहे. उपचारांनी ते चांगले होण्याची शक्यता डॉक्टरांनीही वर्तविली आहे. त्यामुळे महतो यांच्या पत्नीची उमेद जागली. पण त्यांच्यावर किमान १५ दिवस उपचारांची गरज असून प्रत्येक दिवसाच्या उपचाराचा खर्च ३५ हजार आहे. आनंद रहाटे यांनी बँकेशी संपर्क साधून बँकेकडून १ लाख ७५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. एससी, एसटी असोसिएशनच्या सदस्यांकडूनही एक लाख रुपयांची मदत निर्माण केली. पण अजूनही सात ते आठ लाखांचा निधी उपचाराला लागणार आहे. अखेर आनंद रहाटे यांनी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पेंढारकर यांना मदत मिळेपर्यंत मुदत देण्याची विनंती केली. त्यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. महतो यांच्या दोन मुली १० वी आणि १२ वी ला आहे. एक मुलगा आहे. आतापर्यंत दागिने आणि सारेच विकून उपचार केला. त्यांचे नागपुरात कुणीही नाही. महतो यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावर उपचार झाले तर ते चांगले होऊ शकतात आणि एका कुटुंबाचे छत्र वाचू शकते. मधुबाला आपल्या पतीच्या उपचारांसाठी हतबल झाल्या आहेत. प्रत्येकाने शक्य ती आर्थिक मदत केली तर महतो यांचा जीव वाचू शकतो. यासाठी त्यांनी लोकमतकडे आर्त विनंती केली आहे. केवळ पैशांसाठी त्यांचा उपचार थांबला तर... तो थांबू नये आणि ते चांगले व्हावेत म्हणून समाजाने मदत करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दानदात्यांनी आपली मदत मधुबाला रामबाबू महतो, बँक आॅफ महाराष्ट्र, यांचे खाते क्रमांक ६०२२२३४९९८४ यात करावी. बँकेचा आयएफएससी कोड एमएएचबी ००००३४१ हा आहे. महतो यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन मधुबाला यांच्यासह बँक आॅफ महाराष्ट्र, धरमपेठ शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक आनंद रहाटे यांनी केले आहे. मधुबाला यांचा मोबाईल क्रमांक ७३८९१२८९५८ हा आहे. (प्रतिनिधी)