शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणासाठी इटलीकडून नागपूरला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 10:10 IST

पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

ठळक मुद्दे३ जुलैला मनपासोबत करणार करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. महापालिका व इटलीचे शिष्टमंडळा यांच्यात येत्या ३ जुलैला सामंजस्य करार होणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी दिली.हवामानातील बदल हे त्या शहरात होणाऱ्या प्रदूषणावर अवलंबून असतात. औद्योगिकीकरण व वाहनांचा होणारा वापर यामुळे मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होते. परिणामी पृथ्वीवरील उष्णता वाढते. यामुळे ग्लेशिअर अर्थात बर्फ वितळत असल्याने समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. यालाच ग्लोबल वार्मिंग म्हणतात. हे सर्व थांबविण्याकरिता कार्बन उत्सर्जन थांबविण्यावर काम करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेच महापालिकेन इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीन बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा विचार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अपारंपरीक ऊर्जा स्रोत अर्थात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यावर भर द्यावा लागेल. शिवाय, जे प्रदूषण शहरात आधीच झाले आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. याकरिता, इटली देशाने नागपूर शहरासोबत करार करण्यास तयारी दर्शविली आहे. पर्यावरणासाठी ते शहराला आर्थिक मदत करणार आहेत.

‘वर्ल्ड काँग्रेस’मध्ये महापौरांचा सहभागहवामानातील होणाऱ्या बदलाचा सामना करण्यासाठी कॅनडातील मोन्ट्रेल शहरात आयोजित वर्ल्ड काँग्रेसमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी सहभाग घेतला होता. यात नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी नागपूर महापालिका प्रयत्नशील असल्याची भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. भारतातून एकमेव नागपूर शहराला वर्ल्ड काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका