शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आर्थिक गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:15 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा विभागातील गोपनीय विभागातील आर्थिक गोलमाल समोर आला आहे.

ठळक मुद्देपरीक्षकांना देण्याचे लाखाहून अधिक रुपये गायब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा विभागातील गोपनीय विभागातील आर्थिक गोलमाल समोर आला आहे. उन्हाळी परीक्षांसाठी पेपर ‘सेट’ करायला येणाऱ्या परीक्षकांना देण्यात येणारी लाखो रुपयांची रक्कम गायब झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही रक्कम अनेक लाखांची नसून एक लाखाच्या जवळपास असल्याचा दावा परीक्षा विभागातील सूत्रांनी केला आहे. आता या रकमेची चोरी झाली आहे की हिशेबात काही गडबड झाली आहे, याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.नागपूर विद्यापीठात सद्यस्थितीत उन्हाळी परीक्षांचे काम सुरू आहे. परीक्षांचे पेपर ‘सेट’ करण्यासाठी नागपुरातून तसेच नागपूरबाहेरून दररोज परीक्षक परीक्षा भवनात येत आहेत. नियमांनुसार एक पेपर ‘सेट’ करण्यासाठी परीक्षकांना ३५० रुपयांचे मानधन तसेच १०० रुपयांपर्यंत ‘कन्व्हेनन्स’ देण्यात येतो. ही रक्कम साधारणत: रोख स्वरूपात असते. यासाठी विद्यापीठाकडून गोपनीय विभागाला सुमारे १० लाखांपर्यंतचा अग्रीम निधी देण्यात येतो. दोन धनादेशांत ही रक्कम देण्यात येते व गोपनीय विभागाकडून ‘क्लर्क’ दोन दोन लाख रुपये त्यातून काढतो व त्या निधीचा वापर करण्यात येतो. परीक्षकांना दिलेल्या निधीचा नियमितपणे हिशेब ठेवण्यात येतो. गुरुवारी परीक्षा विभागातील लिपिक नेहमीप्रमाणे सायंकाळी कुलूप लावून गेला. शुक्रवारी कुलूप उघडल्यावर रक्कम तपासली असता त्यात एक लाख रुपयाहून अधिक रक्कम नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर गोपनीय विभागातील अधिकारी हादरले व त्यानंतर पैशांची हेराफेरी झाली की काय, या दिशेने चाचपणी होण्यास सुरुवात झाली.

अद्याप लेखी माहिती नाहीयासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता, असा कुठलाही प्रकार झाल्याची लेखी तक्रार किंवा माहिती आमच्याकडे कुठल्याही कर्मचारी, विभागाकडून आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केली. जर तक्रार आली तर आम्ही तातडीने चौकशी करू; शिवाय आमच्या पातळीवर असा काही प्रकार झाला आहे का याची चौकशी करु, असे त्यांनी स्पष्ट केले.

चोरी की हिशेबात गडबड?परीक्षा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी बाहेरील कुठल्या व्यक्तीने येऊन चोरी केल्याचे निदर्शनास आलेले नाही. कुलूप तुटलेले नव्हते. अनेक वर्षांपासून इथे हिशेबात गडबडीचादेखील कुठलाही प्रकार घडला नाही. त्यामुळे अचानक नेमका घोटाळा झाला, ही आश्चर्याची बाब आहे. जर चोरी झाली नसेल व हिशेबात गडबड असेल तर निश्चितपणे विद्यापीठाला चौकशी करावीच लागेल. नेमकी किती रक्कम गायब आहे. मंगळवारीच समोर येईल. संबंधित कर्मचाऱ्यांकडून हिशेब लागत नसल्यास ती रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ