शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मेडिकलमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राटदाराकडून आर्थिक शोषण

By गणेश हुड | Updated: May 13, 2024 20:14 IST

संघटनेचा आरोप :  १०८ सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार :  बुधवारपासून आंदोलन.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यासाठी १५ मे पासून मेडिकल रुग्णालयापुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी  सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भारतीय मजूदर महासंघाचे प्रदेश महामंत्री गजानन गदलेवार, कंत्राटी कर्मचारी संघाच्या सचिव प्रिती मेश्राम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मेडिकलमध्ये मागील १० ते १२ वर्षापासून कार्यरत  कंत्राटी  कर्मचाऱ्यांना दर महिन्याला  सहा ते सात   हजार रुपये वेतन देवून कंत्राटदार व व्यवस्थापनाकडून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण सुरु आहे. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.  दुसरीकडे मेडिकलमध्ये ५८० पदासाठी भरती प्रक्रीया राबवली जात आहे. यात या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार समावून घेण्याची संघटनेने मागणी केली.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मेडिकलच्या सेवेत समावून घेण्याचे निर्देश मेडिकल प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. अशी माहिती मुन्ना यादव यांनी दिली.   १०८ सुरक्षा रक्षक बेरोजगार १ मे रोजी मेडिकल रुग्णालयात १०८ खासगी सुरक्षा रक्षकांना कामारुन कमी करून त्यांचा  रोजगार हिरावला आहे. सुरक्षा रक्षकांना कोणतीही नोटीस व कारण न देता या सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त केली आहे. १२ वर्षांपूर्वी फक्त ४ हजार ४०० रुपये मासिक वेतनावर १०८ कर्मचारी रुजू झाले होते. आता ६ हजार रुपये मासिक वेतन त्यांना मिळत होते. हे सुरक्षारक्षक सेवेत असलेल्या ‘युनिटी सेक्युरिटी फोर्स’ या खासगी एजन्सीकडून किमान वेतनानुसारही वेतन दिले जात नव्हते. असा आरोप संघटनेने केला.

टॅग्स :nagpurनागपूर