शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

नागनदी प्रकल्पामुळे मनपावर वाढणार आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:15 IST

नागपूर महानगरपालिकेचा खर्च दररोज वाढत चालला असताना त्या तुलनेत उत्पन्नाची साधने मात्र कमी आहेत. अशातच पुन्हा नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी हालचाली वाढल्या आहेत. २४३४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मनपाला १५ टक्के अर्थात ३६५.१० कोटी रुपयांचा भार उचलावा लागणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाचा खर्च २४३४ कोटींवर : मनपाला द्यावे लागणार ३६५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेचा खर्च दररोज वाढत चालला असताना त्या तुलनेत उत्पन्नाची साधने मात्र कमी आहेत. अशातच पुन्हा नाग नदी पुनरुज्जीवन व प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी हालचाली वाढल्या आहेत. २४३४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मनपाला १५ टक्के अर्थात ३६५.१० कोटी रुपयांचा भार उचलावा लागणार आहे. सिमेंट रोड प्रकल्पामुळे आधीच मनपाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशातच नाग नदी प्रकल्प कार्यन्वित झाला तर मनपासमोर कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. असे झाले तर मनपावरील ताण प्रचंड वाढणार आहे. २३ जुलैला होणाऱ्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.मनपांतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. त्यांची देयके अदा करण्यासाठी मनपाकडे निधी नाही. सिमेंट रोडच्या तीन टप्प्यातील कामामध्ये ३५० कोटी रुपयांच्या निधीची जुळवाजुळव करताना मनपाची स्थिती बरीच खराब झाली आहे.नागपूर शहरातील प्रमुख असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी २५ नोव्हेंबर २००८ मध्ये प्रस्ताव सादर झाला होता. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१० आणि १८ मार्च २०१६ मध्ये पुन्हा हा प्रस्ताव सादर करून मंजूर करून घेण्यात आला होता. १८ मार्च २०१६ ला या प्रकल्पाच्या कामासाठी मनपाने १४७६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करून राज्य व केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर केंद्राने १२५२.३३ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला होता. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजेंसी (जिका) मार्फत केंद्र सरकारने सॉफ्ट लोन घेण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली होती. कर्ज देण्यापूर्वीची कार्यवाही म्हणून जिकाची चमू जानेवारी २०१९ पासून नागपुरात चौकशी व तपासणी करीत आहे. २०१४ च्या दरपत्रकानुसार प्रकल्प मंजूर झाला असला तरी पाच वर्षात या प्रकल्पाची किंमत दुपटीने वाढली. त्यामुळे आता सुधारित दरपत्रक तयार केले जात आहे. यात प्रकल्पाचे व्यवस्थापकीय सल्लागार, कॉस्ट एक्सक्लेशन कॉन्टेंजन्सी, जमीन अधिग्रहण, जीएसटी आदी मिळवून हे सुधारित दरपत्रक २४३४ कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे . या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य सरकार २५ टक्के आणि केंद्र सरकार ६० टक्के अनुदान देणार आहे. मनपाच्या सुधारित आराखड्यानुसार  आता ३६५.१० कोटी रुपये निर्धारित कालावधीत प्रकल्पावर खर्च करावा लागणार आहे.  नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील घरे तुटणार नाग नदी प्रक ल्पांतर्गत दोन्ही काठावरील जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणावरील घरे मोठ्या संख्येने तोडली जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर  नदीच्या १७.५० किलोमीटर लांबीचे क्षेत्रातील घरांचा सर्वे करून ही घरे हटविण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. दुर्बल घटक समिती सदस्य जाहीर होणार२३ जुलैला होणाऱ्या विशेष सभेमध्ये मनपाच्या दुर्बल घटक समितीमधील वर्षे २०१९-२० या कालावधीसाठी सदस्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.  हरीश दिकोंडवार यांच्याकडे सध्या सभापतिपदाची जबाबदारी आहे. भविष्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या समितीवर दमदार सदस्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली भाजपा नेतृत्वाकडून सुरू आहेत.  

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNaag Riverनाग नदी