शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मोक ाट कुत्र्यांवर होणार नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:18 IST

मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ठळक मुद्देमनपाचा दोन संस्थांशी करार : आठवडाभरात प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रात्रीला शहरात मोकाट कुत्र्यांची गस्त असते. यामुळे रात्री उशिरा कामावरून परतणाºयांत प्रचंड दहशत आहे. नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने कुत्र्यांची वाढणारी संख्या कशी रोखायची असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला होता. परंतु नसबंदीचा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे. यासाठी दोन संस्थांनी सहमती दर्शविली आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. लोकमतने वेळोवेळी शहरातील मोकाट कुत्रे आणि जणावरांकडून नागरिकांना होणाºया त्रासाकडे लक्ष वेधले होते. हे विशेष.सोसायटी फॉर प्रिव्हन्शन आॅफ क्रुरिटी अ‍ॅनिमल व बेस्ट फॉर अ‍ॅनिमल (सातारा) या दोन संस्थांवर नसबंदीची जबाबदारी सोपविली आहे. करारनामा व कामाचे स्वरूप निश्चित झाल्यानंतर आठवडाभरात नसबंदीच्या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. मोकाट कुत्र्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासन नसबंदीचा व्यापक कार्यक्रम राबविणार आहे.ओळख पटण्यासाठी निशाणीनागपूर शहरात ८० ते ९० हजार मोकाट कुत्रे आहेत. त्यामुळे नसबंदी केलेल्या कुत्र्यांची ओळख पटावी. यासाठी त्यांना निशाणी लावली जाणार आहे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांचा कान कापणे अथवा बिल्ला लावण्याचा विचार आहे. मात्र बिल्ला पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कापण्याचा विचार केला जात आहे.शहरालगतच्या भागावर लक्षमोकाट कुत्र्यांची संख्या प्रामुख्याने शहरालगतच्या व मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे नसबंदी उपक्रमाला या भागातून सुरुवात करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मोक ाट कुत्र्यांची संख्या अधिक असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.कुत्र्यांची गणनासाधारणपणे नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या तीन टक्के असते. कुत्र्यांची प्रभागनिहाय गणना करताना प्रभागातील लोकसंख्या व कुत्र्यांची संख्या याची सरासरी संकलित केली जात आहे. यापूर्वी नसबंदी करण्यात आलेल्या, नसबंदी न झालेल्या कुत्र्यांचा डाटा तयार करणार आहे. सोबतच कुत्र्यांची लहान पिले व गर्भधारणा झालेल्या कुत्र्यांचीही माहिती संकलित केली जाणार आहे. कोल्हापूर येथील व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेवर गणनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.आठवडाभरात नसबंदीचा उपक्रमशहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी प्रभागनिहाय डाटा संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच आठवडाभरात नसबंदीचा उपक्रम राबविला जाणार आहे. ही जबाबदारी दोन संस्थांवर सोपविण्यात आली आहे.- डॉ. गजेंद्र महल्ले, पशुचिकि त्सक महापालिका