शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं! गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल आठवडाभरात तुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 20:31 IST

Nagpur News नागपूर रेल्वे स्टेशन समोरील टेकडी उड्डाणपुलावर आठवडाभरातच बुलडोझर चालणार आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण निस्तारले आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे.

नागपूर :  नागपूर रेल्वे स्टेशन समोरील टेकडी उड्डाणपुलावर आठवडाभरातच बुलडोझर चालणार आहे. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण निस्तारले आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांसाठी पार्किंगची सोय व २०० दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे बनणार आहे. महापालिकेकडे पुलाखाली असलेल्या दुकानांना खाली करण्याची जबाबदारी होती. गत ५ वर्षांपासून महापालिकेचे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश आल्याने आठवड्याभरातच पूल तुटणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहे.

या उड्डाणपुलाची १६४ दुकाने वितरित करण्यात आली होती. यातील ११२ दुकानांचा प्रश्न आधीच संपुष्टात आला होता. ५२ दुकानदार न्यायालयात गेले होते. त्यांचेही प्रकरण न्यायालयाने संपविले. परंतु कनिष्ठ न्यायालयात परवानाधारकांचा प्रश्न कायम होता. त्यांनीही त्यांची याचिका मागे घेतली. या परवानाधारकांचा वाद निकाली काढण्यासाठी एक दिवसापूर्वीच मनपा मुख्यालयात बैठक झाली. यात ८ जणांना नुकसानभरपाई तर ७ जणांना ईश्वर चिठ्ठीने दुकानाच्या बदल्यात दुकाने देण्यावर सहमती झाली.

- मेट्रो तोडणार पूल

हा प्रकल्प साकारण्यात नागपूर महापालिका, मेट्रो रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे कार्यवाही करीत आहे. नागपूर महापालिकेला उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामे करून द्यायची होती. त्यानुसार महापालिकेने जबाबदारी पूर्ण केली आहे. पूल तोडण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सीआरएफ फंडातून होणार आहे. हा फंड पीडब्ल्यूडीला मिळणार आहे. बांधकाम एजन्सी मेट्रो रेल्वे असून, प्रकल्पाचा प्लॅन तयार करणे तो मंजूर करणे आणि मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून त्याची निर्मिती करून घेणे ही जबाबदारी पीडब्ल्यूडीची आहे.

उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानांना एमपी बस स्टॅण्ड परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. २०० गाळ्यांचा हा प्रकल्प आहे. ३५ दुकानदारांनी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? कायमस्वरूपी कुठे होणार? यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. पीडब्ल्यूडीकडून यासंदर्भात ॲफिडेव्हीट सादर करणार आहे. पण पूल तोडण्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे निस्तारली आहे. त्यामुळे पूल तोडण्यात कुठलीही अडचण नाही. दुकाने तोडण्याचे काम आठवड्यात हे काम सुरू होईल.

मिलिंद मेश्राम, उपायुक्त, मनपा

टॅग्स :GovernmentसरकारNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर