शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागपूरचे कॉटन मार्केट उघडलेच नाही  :  महापौरांचे निर्देश पाळले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:50 IST

महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.

ठळक मुद्देबाजाराचे सर्व गेट बंद, रेशीमबागेत गर्दी

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत कॉटन मार्केट बंद राहील, असे बोर्ड कॉटन मार्केटच्या गेटवर झळकत आहे. त्यानंतरही महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.कॉटन मार्केट शनिवारपासून सुरू होणार असल्याचे आदेश महापौरांनी दिले. तसे वृत्तही सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. त्यानुसार पहाटेपासून शेतकऱ्यांनी गाड्यांमधून भाज्या बाजारात आणल्या, शिवाय व्यापारी आणि अडतिये पोहोचले. पण मनपा कर्मचाऱ्यांनी आदेश नसल्याने गेट उघडता येणार नाही, असे सांगून सर्वांना परत पाठविले.महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, निर्जंतुकीकरणासाठी बाजार दोन दिवस बंद ठेवणार असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले होते. पण सहा दिवसानंतरही बाजार सुरू झाला नाही. महापौरांनी बाजार सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही सर्व अडतिये पहाटेच बाजार परिसरात पोहोचलो. पण प्रवेशद्वार बंद होते. शेतकऱ्यांनी ४५ ते ५० गाड्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. वाट पाहिल्यानंतर त्यांनाही भाज्या अन्य बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कॉटन मार्केट सुरू करण्याची शेतकरी, व्यापारी आणि अडतियांची मागणी आहे. त्यानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना प्लॅन दिला आहे. गर्दी होऊ नये म्हणून सात गेटऐवजी दोन गेट सुरू करण्यास सांगितले आहे. शिवाय गाड्यांमधून भाज्या उतरवून दुकानात ठेवण्याची माहिती दिली आहे. दुकानातूनच विक्री करू, असे आम्ही सांगितले आहे. पण आयुक्तांनी या नियोजनावर अजूनही निर्णय घेतला नाही.याउलट कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये येणारे शेतकरी गाड्या घेऊन रेशीमबाग आणि अन्य ठिकाणी जात आहे. रेशीमबागेत गाड्या आणि भाज्या खरेदी करणाºया ग्राहकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कॉटन मार्केटमध्ये शेतकºयांना भाज्या विक्रीला परवानगी दिल्यास रेशीमबागेत गर्दी होणार नाही, असे महाजन म्हणाले.

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केटMayorमहापौर