शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनपा स्थायी समितीच्या बैठकीचा अजेंडा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 20:43 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची २० मे रोजीची बैठक मनपा प्रशासनाने रद्द केली होती. मात्र प्रशासनाकडून आयोजित विविध बैठकासाठी सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही का, मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम का, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी उपस्थित केला होता. पदाधिकारी व प्रशासनातील वादामुळे समितीची बैठक कधी होणार याची उत्सुकता होती. अखेर १ जूनला बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१ जूनला समितीची बैठक : सोशल डिस्टन्स ठेवून बैठक घेण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची २० मे रोजीची बैठक मनपा प्रशासनाने रद्द केली होती. मात्र प्रशासनाकडून आयोजित विविध बैठकासाठी सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही का, मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम का, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी उपस्थित केला होता. पदाधिकारी व प्रशासनातील वादामुळे समितीची बैठक कधी होणार याची उत्सुकता होती. अखेर १ जूनला बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतचा अजेंडा निगम सचिवांनी बुधवारी काढला.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा, शहरातील पाणीपुरवठा व अन्य अत्यावश्यक सेवा संदर्भात २० तारखेच्या बैठकीत चर्चा केली जाणार होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकात निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयुक्तांच्या निर्देशानुसार मनपाच्या प्रभारी सचिव रंजना लाडे यांनी अध्यक्षांना बैठक रद्द करण्याबाबतचे पत्र दिले होते. यावर अध्यक्षांसह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.महापालिका मुख्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, कोविड-१९ संदर्भात बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांना उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांहून अधिक संख्या स्थायी समितीच्या बैठकीला राहात नाही. असे असतानाही बैठक रद्द करण्यात आल्याने वाद वाढला होता.अखेर स्थायी समितीची बैठक १ जूनला आयोजित करण्यात आली आहे. यात अंबाझरी तलावातील मच्छिमारी बाबतच्या निविदा मंजुरी व अन्य विषयांचा अजेंड्यात समावेश आहे. या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पाणीपुरवठा यावरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका