शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भाचे वारकरी मधुकरराव किंमतकर अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:09 IST

विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या पार्थिवावर रामटेकच्या अंबाळा घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देरामटेकच्या अंबाळा घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या पार्थिवावर रामटेकच्या अंबाळा घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी फैरी झाडून सलामी दिली. पुत्र प्रसाद किंमतकर यांनी चितेला भडाग्नी दिला. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मधुकरराव यांच्या चाहत्यांनी त्यांना अखेरचा दंडवत केला.तत्पूर्वी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. रामटेक शहरासह पंचक्रोशीतून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी तेथेच अंत्यदर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आ. डी. एम. रेड्डी, माजी आ. आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, गोंगपाचे राष्टय अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम, डॉ. राजीव पोतदार, सदानंद निमकर, टेकचंद सावरकर, तापेश्वर वैद्य आदी उपस्थित होते. त्यानंतर समर्थ विद्यालयाच्या प्रांगणातून फुलांनी सजविलेल्या ट्रकवर पार्थिव ठेवून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. किसान चौकातील काँग्रेस कमेटीचे कार्यालय, राष्ट्रीय आदर्श विद्यालय, गांधी चौक, नरेंद्र तिडके महाविद्यालय आदी ठिकाणी मान्यवरांसह नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. अंबाळा घाटावर पोलीस अधीक्षश शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वात पोलीस दलाने ११ बंदुकीतून फैऱ्या झाडत सलामी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत अंबाळा घाटावर शोकसभा घेण्यात आली. यावेळी आशिष जयस्वाल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, राजेंद्र मुळक, सलील देशमुख, नितीन रोंघे, माजी खा. सुरेश वाघमारे, आ. रेड्डी, बी. टी. देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :Politicsराजकारण