शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ अनियोजनावर उत्तरासाठी सीबीएसईला अंतिम संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:44 IST

एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब करण्यात आला असा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केला. त्यावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला न्यायालयाने बुधवारी अंतिम संधी म्हणून ११ जूनपर्यंत वेळ वाढवून दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : उपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवाल विरोधात

 

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब करण्यात आला असा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केला. त्यावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला न्यायालयाने बुधवारी अंतिम संधी म्हणून ११ जूनपर्यंत वेळ वाढवून दिला.गेल्या तारखेला न्यायालयाने मंडळाला उत्तर सादर करण्यासाठी बुधवारपर्यंतच वेळ दिला होता. परंतु, मंडळाला या वेळेत उत्तर सादर करता आले नाही. त्यामुळे मंडळाने ११ जूनपर्यंत वेळ वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता अंतिम संधी म्हणून मंडळाची विनंती मान्य केली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात वैष्णवी मणियार या विद्यार्थिनीने रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेतील माहितीनुसार, ‘नीट’ परीक्षा तीन तासांची होती. त्यासाठी सकाळी १० ते १ वाजताची वेळ देण्यात आली होती. याचिकाकर्तीचा रोल नंबर खोली क्र. ३९ मध्ये होता. तेथील विद्यार्थ्यांना सीलबंद लिफाफ्यामध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. दरम्यान, समवेक्षकाने पुढील सूचनेशिवाय लिफाफा उघडू नये, अशी सूचना केली. त्यामुळे कुणीच लिफाफा उघडला नाही. सकाळी १०.३० वाजता वरिष्ठ समवेक्षक आल्यानंतर त्यांनी ताबडतोब लिफाफा उघडून पेपर सोडवायला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावेळी विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी दुपारी १.३० वाजतापर्यंत वेळ मिळेल असे वाटले होते. परंतु, त्यांचे पेपर अगदी वेळेवर, म्हणजे, दुपारी १ वाजताच परत घेण्यात आले. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. मुग्धा व अ‍ॅड. रोहण चांदुरकर, आदर्श विद्यालयातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, सीबीएसईतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी.एस. कप्तान यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाHigh Courtउच्च न्यायालय