शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध : आक्षेप खारीज; महिला आरक्षण जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 11:32 IST

सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.

नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण ३१ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार १८ आक्षेप नोंदविण्यात आले होते. मात्र, निवडणूक आयोगाने सर्व आक्षेप फेटाळल्याने सोडतीनुसार जाहीर करण्यात आलेले आरक्षण कायम राहणार आहे.

सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या अंतिम प्रारूपाला १२ मे रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर ३१ मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यावर १ जून ते ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार १८ आक्षेप आले होते. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४,४७,४९४ एवढी असून यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,८०,७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,८८,४४४ एवढी आहे. नागपूर शहराची ५२ प्रभागांमध्ये विभागणी करून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे.

असे होते आक्षेप

- प्रभाग ४ मध्ये अनुसूचित जाती महिलाऐवजी अनुसूचित जाती पुरुषासाठी राखीव करण्याची मागणी केली होती. हा आक्षेप फेटाळण्यात आला.

- विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव नाही. मग मनपा निवडणुकीतच का? असा प्रश्न आक्षेपातून उपस्थित करण्यात आला. तर काही प्रभागात आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गासाठी जागा ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. हे आक्षेपही फेटाळण्यात आले.

  • एकूण प्रभाग -५२
  • एकूण सदस्यसंख्या -१५६
  • महिलांसाठी राखीव-७८
  • अनुसूचित जातीच्या ३१ पैकी १६ जागा महिलांसाठी राखीव
  • अनुसूचित जमातीच्या १२ पैकी ६ जागा महिलांसाठी राखीव
  • सर्वसाधारण प्रवर्गाच्या ११३ पैकी ५६ जागा महिलांसाठी राखीव
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूकnagpurनागपूर