शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हडपणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:28 IST

निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहानकर आणि सतीश भाऊरावजी शहानकर (रा. वानाडोंगरी) अशी आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देगरीब महिलेची फसवणूक : बापलेकासह चार आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहानकर आणि सतीश भाऊरावजी शहानकर (रा. वानाडोंगरी) अशी आरोपींची नावे आहेत.तक्रारकर्त्या महिलेचे नाव सिंधूताई रामकृष्ण नस्से (वय ४०) असून, त्या वानाडोंगरीतील जुन्या वस्तीत राहतात. एमआयडीसीतील हिंगणा मार्गावर मौजा वानाडोगरीत (खसरा नंबर ३५०) सिंधूतार्इंच्या वडिलांची जमीन आहे. ०.५४ आर जमिनीपैकी ०.४० आर (एक एकर) जमीन सिंधूतार्इंचे वडील नत्थूजी लडी यांनी ७ जून १९८४ ला दस्तनंबर ३७३०/ १९८४ प्रमाणे आरोपी वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी) यांना विकली होती. त्यातील ०.१४ आर जमीन तशीच होती. या जमिनीकडे मूळ मालक आणि त्यांच्या वारसाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून आरोपी बेदरकर बापलेकाने सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नागपूर या संस्थेला ही जमीन विकली. त्यावेळी त्यांनी केलेल्या विक्रीपत्रात ०.४० ऐवजी ०.५४ आर जमिनीचे विक्रीपत्र आरोपींनी करून दिले. सहकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यीदित नागपूरचे अध्यक्ष सेवकराव शहानकर आणि सचिव सतीश शहानकर या दोघांनी बेदरकर बापलेकाच्या कटकारस्थानात सहभागी होऊन निराधार सिंधूतार्इंच्या वडिलांची ०.१४ आर (सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट) जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या ताब्यात घेतली. त्यावर लेआऊट टाकून भूखंडही विकून टाकले. १६ जानेवारी १९९२ पासून आरोपी बेदरकर पिता-पुत्र, सेवकराम शहानकर आणि सतीश शहानकर यांनी ही बनवाबनवी केली. ती ध्यानात आल्यानंतर सिंधूतार्इंनी वारंवार त्यांच्याकडे आपली जमीन परत मिळावी म्हणून आर्जव-विनंत्या केल्या, मात्र त्यांना आरोपींनी दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी चौकशीअंती भादंविच्या कलम ४२०, ११४ अन्वये गुन्हा दाखल केला.भूमाफियांना खुले रानया प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र आरोपींना अटक झाली की नाही, ते पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. लाखो रुपयांच्या जमिनींच्या प्रकरणात बरेचदा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तातडीने अटक केली जात नाही. अनेक प्रकरणांत पोलीस माहितीही उशिरा देतात. पोलिसांची अशी साथ मिळाल्यामुळे आरोपी अटकपूर्व जामीन मिळवतात. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या हिंगण्यातील सतीश मुंडे प्रकरणासह अनेक प्रकरणांत ठिकठिकाणच्या पोलिसांनी अशी संशयित भूमिका वठवली आहे. आरोपींना अटक झाली की नाही, अशी विचारणा केली असता चौकशी सुरू आहे, असे उत्तर देऊन पोलीस मोकळे होतात. पोलिसांकडूनच रान मोकळे झाल्यामुळे भूमाफिया अनेक गरीब आणि पीडितांची जमीन राजरोसपणे हडपत आहेत. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर