शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ॲक्टिव्हाने जात असलेल्या तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूचा गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ॲक्टिव्हाने जात असलेल्या तरुण अभियंत्याचा जीव घेणाऱ्या पतंगबाजांविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शाेध घेतला जात आहे. दरम्यान, बुधवारी प्रणय ठाकरे याच्या अंत्यसंस्कारादरम्यान ज्ञानेश्वरनगरात शोकाकुल वातावरण होते.

मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता इमामवाड्यातील जाटतरोडी चौकीसमोर नायलॉन मांजामुळे २० वर्षीय प्रणयचा गळा कापला गेला. प्रणयने हेल्मेट घातले होते. त्यानंतरही मांजाने त्याचा गळा खोलवर कापला गेला. त्याला लगेच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. पोलिसांनी भादंवि कलम ३०४ (अ) १८८ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या घटनेत पोलीस सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करतात. परंतु या प्रकरणात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने दिसून येते.

पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, प्रणयच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळ परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. परिसरातील लोकांनाही विचारपूस केली जाणार आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेतील प्रत्यक्षदर्शींचे दोन मत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, नायलॉन मांजा एका वाहनात अडकला होता. तर काहींचे म्हणणे आहे की, दोन्ही बाजूकडून मांजा ओढल्यामुळे ही घटना घडली. मुलाच्या मृत्यूमुळे ठाकरे कुटुंबात शोक पसरला आहे. त्यांनीसुद्धा दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.