शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 22:36 IST

FIR against Inspector Vinod Chaudhary प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व शिक्षक मो. अशफाक अली यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०६, २९४, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचा आदेश लकडगंज पोलीस निरीक्षकांना दिला.

ठळक मुद्देप्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व शिक्षक मो. अशफाक अली यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०६, २९४, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचा आदेश लकडगंज पोलीस निरीक्षकांना दिला. तसेच, प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.

प्रकरणावर न्या. व्ही.एम. देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चौधरी व अली यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक राजा जमशेद शरीफ यांनी अर्ज दाखल केला होता. शरीफ यांनी अली यांना घर बांधण्यासाठी वेळोवेळी एकूण १४ लाख ६ हजार रुपये दिले होते. तसेच, त्याविषयी करार केला होता. परंतु, अली यांनी निर्धारित वेळेत ही रक्कम परत केली नाही. उलट चौधरी यांच्या मदतीने शरीफ यांना दाबण्याचा प्रयत्न केला. १२ मार्च २०२० रोजी चौधरी यांनी शरीफ यांना गुन्हे शाखा कार्यालयात बोलावून मारहाण व शिवीगाळ केली. अली यांच्याकडून पैसे घेणे नसल्याचे बळजबरीने लिहून मागितले. तसेच, शरीफ यांची सोन्याची चेन व ब्रासलेट हिसकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अर्जात करण्यात आला होता. त्यामध्ये दखलपात्र गुन्हे आढळून आल्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस