शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी ग्रामपंचायत सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:00 IST

उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे खंडविकास अधिकारी याच्यावर कारवाई करावी व एलईडी लाईट खरेदी प्रकरणातील दोषी सचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश : नवेगाव साधू, एलईडी, सदनिकेवरील कर प्रकरण गाजले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे खंडविकास अधिकारी याच्यावर कारवाई करावी व एलईडी लाईट खरेदी प्रकरणातील दोषी सचिव व सरपंचावर कारवाई करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.नवेगाव साधू येथील तत्कालीन ग्रामसचिव पंजाबराव चव्हाण व सरपंच यांनी २०१५ ते १७ या कालावधीत ग्रामपंचायतीला विविध माध्यमातून प्राप्त झालेला निधी परस्पर खर्च केला. या प्रकरणाची पंचायत विभागाच्या खंड विकास अधिकाºयाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. यात चव्हाण व सरपंचाने नवेगाव साधू ग्रा.पं.अंर्तगत येणाºया ४० ले-आऊट, १२०० खाली भूखंड, ३०० वर घरे आदींवरील गेल्या तीन वर्षांपासून प्राप्त कराच्या रकमेपैकी काही रक्कम बँकेत जमा करून उर्वरित ९७ हजारावरची रक्कम ही परस्पर खर्च केली. तसेच ग्रा.पं.ला शासनाकडून प्राप्त अनुदान, घरकर, इतर कर व फी याची रक्कम बँक खात्यात जमा असताना सचिवाने रेखांकित धनादेशाद्वारे अदा न करता स्वत:चे नावाने चेकद्वारे विड्रॉल करून दोन लाखावरील रक्कम सरपंच व सचिव यांनी संगनमताने खर्च केली. त्यामुळे सचिवाविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी स्थायी समितीत केली. याकडे लक्ष वेधत अध्यक्षांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अभियंत्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्याचबरोबर हिंगणा आणि कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कराबाबत चुकीची माहिती खंडविकास अधिकाºयांनी सादर करून दिशाभूल केली होती. तसेच एलईडी लाईट खरेदीत झालेल्या भ्रष्टाचारात दोषी असलेले सचिव व सरपंच याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष सावरकर यांनी दिले. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती उकेश चव्हाण, आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, सदस्य विजय देशमुख, रूपराव शिंगणे, वर्षा धोपटे, ज्ञानेश्वर कंभाले, सीईओ संजय जादव, अति. सीईओ अंकुश केदार उपस्थित होते.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचार