शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथियांनी घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:42 IST

उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात.

ठळक मुद्दे परिसरात खळबळमारहाण, विवस्त्र होऊन शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पैसे गोळा करण्याच्या वादातून तृतीयपंथियांच्या दोन गटात चक्क पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच जोरदार हाणामारी झाली. एकमेकांना मारहाण केल्यानंतर एकाने विवस्त्र होऊन पोलिसांकडे कपडे भिरकावले. शनिवारी दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात. नुसता विरोधच करत नाही तर एकमेकांवर हल्ला चढवणे, कपडे फाडणे, असेही प्रकार नेहमीच त्यांच्यात घडतात. गेल्या दोन वर्षांत त्यांच्यातील वैमनस्य टोकाचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षी एका गटाने दुस-या गटाची प्रमुख चमचम हिची हत्याही केली होती. तेव्हापासून त्यांच्यातील हाणामा-या थांबल्या असल्या तरी धूसफूस सुरूच आहे. काटोल नाका परिसरात गेल्या तीन दिवसांपासून हे दोन गट एकमेकांवर हल्ले चढवत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी वाडी पोलीस ठाण्याच्या गेटसमोर ते समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना बदडले. पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेला त्यांचा गोंधळ पाहून काही पोलीस धावले. त्यांनी तीन - चार जणांना आतमध्ये नेले तर बाहेर असलेल्या एकाने विवस्त्र होऊन पोलिसांकडे कपडे भिरकावले. पोलिसांच्या नावाने शिमगाही केला. राष्ट्रीय महामार्गावर वाडी पोलीस ठाणे आहे. या ठाण्यातील कारभार अधूनमधून नेहमीच चर्चेला येतो. शनिवारी तो या प्रकारामुळे चर्चेला आला अन् एकच खळबळ उडाली. अल्पावधीतच ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली. वृत्त लिहिस्तोवर दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.

 

टॅग्स :LGBTएलजीबीटी