शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लढाऊ विमानाच्या सुट्या भागांचे नागपुरात उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:49 IST

मिहान-सेझमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर अनिल धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वातील धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ तब्बल दोन वर्षांनंतर शुक्रवार, २७ आॅक्टोबरला दुपारी ४.१५ वाजता होणार आहे.

ठळक मुद्देमिहान-सेझ : कोनशिला समारंभ आज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान-सेझमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर अनिल धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वातील धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ तब्बल दोन वर्षांनंतर शुक्रवार, २७ आॅक्टोबरला दुपारी ४.१५ वाजता होणार आहे.या समारंभात फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स परळे, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फ्रान्सचे राजदूत अ‍ॅलेक्झेंडर जिग्गलर, फ्रान्सच्या डॅसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रापियर आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी उपस्थित राहतील.भारत सरकारने फ्रान्सच्या डॅस्कॉल्ट एव्हिएशनपासून सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे ३६ राफेल फायटर जेट ही लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. करारानुसार फ्रेंच पुरवठादार भारतात ३० हजार कोटी रुपयांचे विमानाचे सुट भाग बनविणार आहे.अटीची पूर्तता करण्यासाठी, डॅसॉल्टने रिलायन्स एडीएजी ग्रुपसह डेसॉल्ट रिलायन्स एव्हिएशन लिमिटेड (डीएआरएल) या नावाने संयुक्त कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत रिलायन्स एडीएजीचा ५१ टक्के आणि डॅसॉल्टचा ४९ टक्के वाटा आहे. डॅसॉल्ट या प्रकल्पात १०० दशलक्ष युरो अर्थात ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ती आतापर्यंत कोणत्याही संरक्षण उत्पादनातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.सुरुवातीला डीआरएएल मिहान-सेझमध्ये राफेल जेटसाठी सुट्या भागांची जोडणी आणि त्यानंतर उत्पादन युनिट सुरू करणार आहे. २०१८ च्या एप्रिल-जून या तिमाहीत उत्पादन होण्याची शक्यता आहे. धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष ७०० आणि अप्रत्यक्ष १५ हजार रोजगाराची निर्मिती होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.