शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

लढत अटीतटीची.. शर्थ मात्र फोटोग्राफरची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 16:09 IST

जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत.

ठळक मुद्देसिल्लारी-खूर्सापार मार्गावर टिपला क्षणअखेर गरुडाने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत. गरुड त्याला चोचीने पुन्हा पकडू पाहतो तर साप त्याला दंश करून हरवू पाहतो.. दोघेही प्राणपणाने लढत राहतात.. एका क्षणाला तर सापाला गिळायला तोंड उघडलेल्या गरुडाच्या जिभेला साप जोरदार दंश करतो... पाहता पाहता गरुडाच्या चोचीने घायाळ झालेला साप अर्धमेला होतो आणि काहीवेळाने गरुड त्याला आपले भक्ष्य बनवतो..वन्यप्राण्यांच्या जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या कुठल्याशा वाहिनीवरचे हे दृश्य नाही.. ते आहे नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील खूर्सापार गावाजवळचे. हृदयाचे ठोके रोखून धरून पाहत हा संपूर्ण घटनाक्रम चित्रबद्ध केला आहे नागपूरचे छायाचित्रकार नितीन मराठे यांनी.क्रिस्टेड सर्पेंट ईगल ज्याला मराठीत तुर्रेवाला गरुड म्हणता येईल आणि स्ट्रिप्ड कीलबॅक असे इंग्रजी नाव असलेल्या बिनविषारी सापाला मराठीत सीतेची लट असे म्हणता येतील यांच्यात ही लढत झाली होती.मागील आठवड्यात शनिवारी (९ जून) रोजी त्यांनी कुटुंबिय व मित्रमंडळीसमवेत पेंच व्याघ्र प्रकल्पात जाण्याचा बेत आखला. ते स्वत: गाडी चालवीत होते. जात असताना सिल्लारी- खूर्सापार मार्गावर त्यांच्या गाडीसमोर अचानक एक गरुड खाली आला आणि त्याने जमिनीवरून जाणाऱ्या सापाला अलगद पकडून जवळच्या झाडावर नेले. तिथे जाऊन तो काही काळ स्तब्ध राहिला. छायाचित्रणाची जाण व आवड असलेल्या मराठे यांच्याजवळ अत्याधुनिक कॅमेरा होताच. त्यांनी क्षणभराचाही विलंब न लावता गाडी तात्काळ थांबवून ते दृष्य कॅमेराबद्ध केले. ज्या झाडावर गरुड होता त्याच्याजवळ अजिबात आवाज होऊ न देता अगदी हळूहळू त्यांनी गाडी चालवत नेली.काही वेळ गाडीतील सर्वजण स्तब्धता राखून त्या गरुडाच्या हालचाली निरखत राहिले. गरुडालाही जेव्हा आश्वस्त वाटले तेव्हा त्याने सापाला झाडावर मोकळे सोडले. सापानेही मोकळिक मिळताच आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यासाठी पवित्रा घेतला. गरुडाने चोचीने सापावर अनेक प्रहार केले. सापानेही गरुडाने तोंड उघडताच त्याच्या जिभेला दंश करून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस अर्धमेल्या झालेल्या सापाने शरणागती पत्करली आणि गरुडाने त्याला आपले भक्ष्य बनविले. त्यांच्यातील या लढतीतील प्रत्येक क्षणाला मराठे यांनी कॅमेराबद्ध केले आहे. ही अटीतटीची झुंज त्यांनी कॅनन ७ डी मार्क २ या कॅमेऱ्याने व १००-४०० एमएमच्या लेन्सने टिपली आहे. त्यांनी यापूर्वीही वन्यजीवांच्या अशा रोमहर्षक घडामोडींचे चित्रण केले आहे.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव