शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मृत्यूचे पाचवे कारण लिव्हर कॅन्सर  : डॉ. गौरव गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:03 IST

मधुमेह, रक्तदाब, व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरी व्यक्ती ‘लिव्हर सिरोसीस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात लिव्हर कॅन्सर मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे, अशी माहिती लिव्हर प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे १०० मधून प्रत्येक तिसरी व्यक्ती बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मधुमेह, रक्तदाब, व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण नसल्यास यकृत (लिव्हर) निकामी होण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. लठ्ठपणामुळे होणारे ‘फॅटी लिव्हर’ हेही एक कारण यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे. शंभर जणामध्ये प्रत्येक तिसरी व्यक्ती ‘लिव्हर सिरोसीस’ या आजाराने बाधित आहे. परिणामी, भारतात लिव्हर कॅन्सर मृत्यूचे पाचवे कारण ठरले आहे, अशी माहिती लिव्हर प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरव गुप्ता यांनी येथे दिली.नागपुरात यकृत प्रत्यारोपणासाठी तीन खासगी रुग्णालयाला आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे यकृत प्रत्यारोपणाची सोय पहिल्यांदाच उपलब्ध होत असल्याने डॉ. गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गुप्ता म्हणाले, सध्या लिव्हरच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, असे असताना यकृत प्रत्यारोपणाला मंजुरी मिळालेल्या रुग्णालयांमध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलचाही समावेश झाल्याने रुग्णांना आता नागपूरबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. यकृतला हिपॅटायटीस ए, बी, सी व डी या पाच प्रकारच्या विषाणूंची बाधा होते. यापैकी हिपॅटायटीस ‘ए’ हा आजार बराच कॉमन आढळतो, तर हिपॅटायटीस ‘बी’ हा गंभीर आजार असून त्यावरील लस ही विकसित झालेली आहे. हिपॅटायटीस ‘डी’ आणि ‘इ’ त्या प्रमाणात धोकादायक नाहीत. परंतु हिपॅटायटीस ‘सी’ ही विषाणूबाधा त्या तुलनेत गंभीर मानली जाते. मुख्य म्हणजे हिपॅटायटीस ‘सी’ ची बाधा झाल्यावर कित्येक वर्षं हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात. यामुळे वेळीच निदान होणे आवश्यक असते. बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा आजार वाढत आहे. अत्यंत गभीर यकृतच्या आजाराच्या कारणांपैकी हा आजार समोर येत आहे. ‘फॅटी लिव्हर’मुळे सिरोसिसही होण्याची शक्यता असते. हा आजार रोखता येण्यासारखा आहे. फक्त सुरूवातीच्या टप्प्यात केवळ जीवनशैलीत बदल करावे लागतात. नियमित व्यायाम व स्थुलतेवर लक्ष ठेवल्यास हा आजार उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.दारूशी संबंधित यकृताचा आजार सर्वाधिकभारतात दारूशी संबंधित यकृताचा आजार सर्वाधिक आहे. दारू सेवन करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांना यकृताचा आजार लवकर होण्याची शक्यता असते. अल्कोहोलमुळे यकृत निकामी झालेले बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात उपचारांसाठी येतात. यातील केवळ एक तृतीयांश रुग्णच यकृत प्रत्यारोपण करतात.

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय