शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दाेन दिवस ताप, मग मिळेल ‘अवकाळी’चा गारवा, १६ ते १९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण

By निशांत वानखेडे | Updated: March 13, 2024 20:00 IST

ऊन्हाचा पाहता सध्या तरी हाेरपळच!

निशांत वानखेडे, नागपूर : सूर्याच्या तापामुळे हाेरपळणाऱ्या विदर्भातील नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे दाेन दिवस आणखी ताप सहन केल्यानंतर त्यापुढचे चार दिवस ‘अवकाळी’चा गारवा मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे १६ ते १९ मार्चदरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यात अगदीच किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

उन्हाळा सुरू हाेताच सूर्याने पुन्हा आग ओकणे सुरू केले असून विदर्भावर तीव्रता जरा जास्तच आहे. नागपूरचा पारा २४ तासात अंशत: वाढून बुधवारी ३८.७ अंशावर पाेहचला, जाे सरासरीपेक्षा ३.१ अंशाने अधिक आहे. ३९.४ अंशासह चंद्रपूर व ३९ अंशासह यवतमाळ सर्वाधिक तापत आहेत. वर्धा अंशत: वाढून ३८.८ अंशावर गेला आहे, तर अकाेला, वाशिम, गाेंदिया, अमरावतीत अंशत: घट हाेत तापमान अनुक्रमे ३८ अंश, ३८.४ अंश, ३७ अंश व ३६.४ अंशावर आहे. रात्रीच्या उष्णतेतही वाढ झाली आहे.

दरम्यान १६ मार्चपासून चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र नागपूर, अमरावती, गाेंदिया व गडचिराेली या चारच जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. शेतकरी रबी पिक काढण्याची लगबगीत लागले आहेत. मात्र अवकाळीच्या शक्यतेने घाबरण्याची गरज नाही, असे अवाहन हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण अवकाळीचा पाऊस हा अगदीच किरकाेळ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस