शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खताच्या किमती वाढणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 02:48 IST

देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते.

हंसराज अहीर : शासकीय रुग्णालयात जेनरिक औषधी उपलब्ध करणारनागपूर : देशभरात ३ लाख १० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. देशात २ लाख ३० हजार मेट्रिक टन खताचे उत्पादन होेते. ८० हजार टन खते विदेशातून आयात केली जातात. गेल्या काही महिन्यात खतांच्या भावात वाढ झालेली नाही. यापुढेही किमती वाढणार नसल्याची ग्वाही केंद्रीय उर्वरक व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात खतांचा तुटवडा नाही. जादा भावाने खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी. यासाठी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात जेनरिक औषधी उपलब्ध करण्यात येईल. महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणा आदी राज्यात वैद्यकीय उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहराची यासाठी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी अद्यावत उपकरणे लावण्यात आलेली आहेत. कोल इंडिया लिमिटेडसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीला भाव मिळत नव्हता. परंतु या विरोधात आंदोलन उभारले. त्यामुळे ज्या २४ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १५० कोटी मिळणार होते. त्यात ३० ते ४० पट वाढ करून २६९० कोटी तसेच १० हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. १५ प्रकल्पात १४०० कोटींचा मोबदला व ४ हजार नोकऱ्या मिळाल्याची माहिती अहीर यांनी दिली. बल्लारपूर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव वाढवून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोकऱ्या स्पर्धात्मक देण्याच्या निर्णयानुसार देशात खनिज क्षेत्रातील मॉईलशिवाय इतर क्षेत्रात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. याला विरोध दर्शवून भूसंपादनाचा वाढीव भाव व वेकोलित १० हजारांवर नोकऱ्या मिळत आहे. कोळसा खाणीसाठी आता एकरी आठ लाख रुपये भाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. कोरपना व भद्रावती तालुक्यातील जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या आहेत. तसेच इतर भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार गिरीश व्यास, संदीप जाधव, किशोर पालांदूरकर व चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)