शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बैलाच्या वादातून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:42 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तास शिवारात २६ जुलै रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा मृत्यू बैलाने मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी भासविण्यात आले होते.

ठळक मुद्दे आरोपीस अटक : दीड महिन्यानंतर फुटले बिंग

लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तास शिवारात २६ जुलै रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा मृत्यू बैलाने मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी भासविण्यात आले होते. मात्र, तिचा मृत्यू बैलाने मारल्याने झाला नसून, तिचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीस अटक केली.तीर्थाबाई जयराम सोनगडे (५५, रा. तास, ता. भिवापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बालकदास तुलाराम अलोणे (३६, रा. तास, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बालकदासची तास शिवारात शेती असून, त्याने यावर्षी शेतात धानाचे पºहे टाकले होते. तीर्थाबाई २६ जुलै रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास बालकदासच्या शेताजवळ तिची बैलजोडी चारत उभी होती. त्यातच जोडीतील एक बैल बालकदासच्या पºह्यात गेला.ही बाब लक्षात येताच बालकदासने बैलामुळे पºह्याचे नुकसान होत असल्याची बतावणी करीत तिच्याशी भांडायला सुरुवात केली.वाद विकोपास जाताच त्याने तीर्थाबाईच्या डोक्यावर पावड्याच्या दांड्याने वार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने ती घटनास्थळीच गतप्राण झाली. दुसरीकडे, तिचा मृत्यू हा बैलाने शिंग मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दर्शविण्यात आले.त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. तिचा मृत्यू बैलाने मारल्याने झाला नसून, तिचा बालकदासने खून केल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी रात्री खुनाचा गुन्हा नोंदवून बालकदासला शनिवारी सकाळी अटक केली. भिवापूर पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे करीत आहेत.गावात कुजबूजघटनेच्या वेळी तास येथील एक महिला घटनास्थळाच्या परिसरात शौचास गेली होती. त्यावेळी बैल शेतात शिरल्याने तीर्थाबाई व बालकदास यांच्यात भांडण सुरू असल्याचे तिच्या निदर्शनास आले. काही वेळाने तीर्थाबाईचा बैलाने मारल्याने मृत्यू झाल्याचे तिच्या कानावर आले. त्यामुळे तिने बघितलेला प्रकार घरच्या मंडळीला सांगतिला. त्यातूनच गावात कुजबूज सुरू झाली. गावात पोलीस वारंवार चौकशीसाठी येत असल्याचे पाहून बालकदासनेही त्या महिलेला धमकावणे सुरू केले होते.